Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवादी संघटनेला मोठा हादरा; अनेक उच्चपदस्थ ३३ नक्षलवादी पोलिसांपुढे नतमस्तक..

नक्षलवादी संघटनेला मोठा हादरा; अनेक उच्चपदस्थ ३३ नक्षलवादी पोलिसांपुढे नतमस्तक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून नक्षलवाद्यांनी जंगल परिसर तसेच परिसरातील आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत आपले अधिराज्य गाजवू पाहण्याचा सपाटा चालवला होता.पण,पूर्वीपासून नक्षलवादी म्हणून ज्यांनी हातात शस्त्रे घेतली,ती कुणासाठी व कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असल्याने अनेकांना कळून चुकले.पूर्वी कळतेय पण वळत नव्हते.आता कळू लागले व हळूहळू वळूही लागल्याने नक्षलवाद्यांनी आता हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे छत्तीसगडच्या विजापूर,सुकमा आणि इतर आसपासच्या जिल्ह्यातील भागात सक्रिय असणारे तब्बल ३३ नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे नतमस्तक म्हणजेच आत्मसमर्पण केले आहे.त्यापैकी २४ जणांवर तब्बल ९० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.आत्मसमर्पण करणारे अनेक नक्षलवादी उच्चपदस्थ नेते असून,यात पीएलजीए कंपनी क्रमांक-२ चे उपकमांडर,माड डिव्हिजन कंपनी क्रमांक-७ पीपीसीएम,एसीएम/पीपीसीएम,एलओएस कमांडर,सीएनएम अध्यक्ष,केएमएस अध्यक्ष आणि केकेबीएन डिव्हिजन पक्ष सदस्य असे अनेक उच्चपदस्थ नेते समाविष्ट आहेत.हे सर्वजण बऱ्याच कालावधीपासून विजापूर,सुकमा आणि आसपासच्या भागात सक्रिय होते.तसेच नक्षलवादी घटनांमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता.राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणामुळे प्रभावित होऊन या नक्षलवाद्यांनी हे पाऊल उचलल्याचे विजापूरचे पोलिस अधीक्षक डॉ.जितेंद्र कुमार यादव यांनी म्हटले आहे. रस्ते बांधकाम, वीज-पाणी सुविधा, शिक्षण आणि आरोग्य सेवा यासारख्या विकासकामांमुळे नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात परत येण्याची प्रेरणा मिळाल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.आत्मसमर्पण कार्यक्रमास केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) उपमहानिरीक्षक राकेश कुमार, विजापूरचे एसपी डॉ.जितेंद्र कुमार यादव,कोब्रा आणि सीआरपीएफ बटालियनचे कमांडंट,एएसपी ऑपरेशन,जिल्हा राखीव गार्ड (DRG),बस्तर फायटर आणि एसटीएफ अधिकारी उपस्थित होते.या ऑपरेशनमध्ये डीआरजी,बस्तर फायटर,एसटीएफ, सीआरपीएफ आणि कोब्रा दलांनी विशेष योगदान दिले आहे.सरकारच्या आत्मसमर्पण धोरणाअंतर्गत, सर्व नक्षलवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्यात आली आहे.याशिवाय,त्यांना पुनर्वसन, रोजगार आणि शिक्षणाच्या सुविधा देखील दिल्या जातील,जेणेकरून ते सुखी समाधानी जीवन सुरू करू शकतील.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!