- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-एका ४२ वर्षीय ग्रामसेवकाने मुलांसोबत खेळत असतांना नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.प्रकरणी ग्रामसेवकावर उमरेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ७४,७५(१), सहकलम पोक्सो १०,१२ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.भारत मधुकर चव्हाण वय ४२ वर्षे,रा.उमरेड असे आरोपीचे नाव असून,तो भिवी महालगाव,ता.भिवापूर,जि.नागपूर येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत होता.
घटनेच्या दिवशी रात्री आठ वाजेच्या सुमारास पिडीत चिमुकली व लहान मुले घराबाहेर असलेल्या चिंचेच्या झाडाखाली खेळत होते.अश्यातच आरोपी भरत चव्हाण तिथे गेला. व त्याने मुलीच्या शरीराला मागून, पुढून व छातीला चुकीच्या पद्धतीने हात लावल्याची बाब पीडित मुलीने आपल्या आईजवळ सांगितली. शिवाय,याबाबत कुणाला सांगितल्यास तुला मारून टाकेन,अशीही धमकी आरोपीने दिल्याची बाब पीडितेने आईजवळ व्यक्त केली.त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिस स्टेशन गाठत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला व गुन्ह्याची तक्रार नोंदविली.त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून पुढील प्रक्रिया पार पाडली.याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन, पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भाग्यश्री कुलकर्णी करीत आहेत.
- Advertisement -

