Wednesday, July 29, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपुरात डीबीएचे २९ वे राज्यस्तरीय कविसंमेलन उत्साहात संपन्न...

चंद्रपुरात डीबीएचे २९ वे राज्यस्तरीय कविसंमेलन उत्साहात संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या डी‌बीए म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी या साहित्यिक संस्थेच्या वतीने डीबीए चंद्रपूर जिल्हा कार्याकारिणीचा चौथा वर्धापन दिन,व डॉ ‌बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा कमिटीच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय कविसंमेलन चंद्रपूर या ठिकाणी कार्यक्रमाध्यक्ष नागपूर विभागीय अध्यक्ष,जेष्ठ कवी तथा पत्रकार सोपानदेव मशाखेत्री यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटात संपन्न झाले.
प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमे समोर दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.मंचावरील सर्व पाहुण्यांचे स्वागत संविधान उद्देशिका व मानाचा पट्टा देऊन करण्यात आले. त्यानंतर डीबीएचे ऊर्जागीत भावना खोब्रागडे संस्थापिका व संपादिका यांनी सादर केले.कोरोना पासून सुरु झालेला हा डीबीएचा प्रवास आजही तेवढ्याच ताकदीने समोर नेण्याचे काम आम्ही सर्व करत आहोत.आणि पुढेही करत राहू.आणखीही बऱ्याच गोष्टीवर प्रकाश टाकत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रशांत खैरे चंद्रपूर जिल्हा सचिव यांनी केले. यानंतर मंचावर उपस्थित मनोज जाधव संस्थापक अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात डीबीएची वाटचाल आजपर्यंत झालेल्या कामकाजचा लेखाजोखा मांडला. ॲड.बांबोळे यांनी सुद्धा आंबेडकरी चळवळीवर भाष्य करून काही साहित्यिकांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक,साहित्यिक कार्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार,मानपत्र,मानाचा पट्टा व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला.संघमित्रा गेडाम नागपूर विभागीय उपाध्यक्षा यांच्या संकल्पनेतून साकार झालेले बाबू हरदास एल.एन.यांच्या जीवन पटावर आधारित बाबू हरदास एल.एन.यांचा क्रांतीघोष जयभीम हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला.या काव्यसंग्रहावर प्रा.डॉ.आशिष थूल यांनी भाष्य केले. त्यात जयभीम या शब्दाची निर्मिती आणि त्याचा इतिहास थोडक्यात मांडला.सोबतच संध्या खरतडे यवतमाळ जिल्हाध्यक्षा,ॲड.पि.डी.काटकर,सुजाता मेश्राम,गजानन माद्यस्वार यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.प्रसंगी भीमपर्व दिनदर्शिका २०२५ यावेळी सर्वांना देण्यात आली.यानंतर पहिल्या सत्राचे अध्यक्षीय भाषण कार्यक्रमाचे अध्यक्ष सोपानदेव मशाखेत्री यांनी आपल्या पहाडी आणि सौम्य आवाजात साहित्यिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.महाराष्ट्रातील तमाम साहित्यिक याठिकाणी उपस्थित होते.लगेचच सर्व साहित्यिकांनी जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला.काही क्षणातच कविसंमेलनाला सुरुवात झाली आणि एकापेक्षा एक दर्जेदार रचना कविमनावर छाप पाडू लागल्या. यवतमाळ,गोंदिया,वर्धा,रत्नागिरी,बुलढाणा,भंडारा वाशिम,अकोला,नागपूर,गडचिरोली,चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यातूनचा कवीवर्ग या कविसंमेलनाला उपस्थित होता.सर्वांनी कार्यक्रमाचा भरभरून आनंद लुटला. सदर कविसंमेलन प्रिती जीवने (भंडारा)यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.या संपूर्ण कार्यक्रमाचा आत्मा म्हणजे सूत्रसंचालन हे रवी ताकसांडे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तसेच प्रभाकर दुर्गे गडचिरोली जिल्हा सचिव या दोन्ही निवेदकांनी आत्मसमर्पित होऊन सांभाळला.अगदीच सुरुवातीपासून ते सरते शेवटी पर्यंत मोलाची आणि महत्वाची कामगिरी बजावणारे डीबीएचे गडचिरोली जिल्हा सचिव प्रभाकर दुर्गे यांचे कष्ट अपार ठरले.तसेच अपेक्षा खोब्रागडे चंद्रपूर जिल्हा ग्राफिक्सकार हिचे सुद्धा खूप सहकार्य लाभले.सुमन चव्हाण गडचिरोली सहसचिव, संगीता दुधे गडचिरोली जिल्हा संघटक, प्रा.प्रशांत खैरे सचिव,छाया जांभुळे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्षा,सुजाता मेश्राम सह सर्व साहित्यिकांच्या सहकार्यातून  संमेलन यशस्वी पार पडले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!