Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीआधार नोंदणी संच वितरणासाठी अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ...

आधार नोंदणी संच वितरणासाठी अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्यामार्फत जिल्ह्यातील रिक्त महसुल मंडळ क्षेत्रांमध्ये आधार नोंदणी सेवा सुलभ करण्याच्या उद्देशाने आधार नोंदणी संचांचे वितरण करण्यात येत आहे.माहिती तंत्रज्ञान संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या संचांच्या आधारे, गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ३१ महसुल मंडळ क्षेत्रांमध्ये आधार नोंदणी सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
या सुविधेसाठी “आपले सरकार सेवा केंद्र चालक” (महा-ई सेवा केंद्र चालक) यांच्याकडून यापूर्वी २७ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र,अपेक्षित प्रमाणात अर्ज प्राप्त न झाल्याने अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवून आता ९ मे २०२५ पर्यंत करण्यात आली आहे.
यासंदर्भात जाहीरात,रिक्त महसुल मंडळांची यादी व अर्जाचा नमुना जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर www.gadchiroli.gov.in उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.अर्ज सादर करण्यासाठी इच्छुक केंद्र चालकांनी लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!