- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-वक्तृत्व व कर्तृत्वाचे धनी भारतीय जनता पक्षाचे कर्मठ व कर्तव्यदक्ष कार्यकर्ते चांगदेव फाये यांची कुरखेडा भाजपा तालुकाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीची घोषणा आज,सोमवार २१ एप्रील रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहराच्या तालुका भाजपा कार्यलयात निवडणूक प्रमुख तथा भाजपा जिल्हा महासचिव गोंविद सारडा यांनी केली.यावेळी निरीक्षक सदानंद कूथे व राजेश जेठानी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने चांगदेव फाये यांना पुष्पगुच्छ तसेच मिठाईचे वितरण करून फटाक्यांची आतिशबाजीत शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ सहकार नेते खेमनाथ पाटील डोंगरवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, अल्पसंख्यक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलुभाई हूसैनी, ओबीसी आघाडीचे जिल्हामहामंत्री तथा माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे,अनूसूचित जाति मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड.उमेश वालदे,जिल्हा सचिव नाजूक पुराम,कृषी उत्पन्न बाजार समीतीचे उपसभापति व्यंकटी नागीलवार,माजी जि.प.सदस्य गीताताई कुंभरे,दत्तू हाडगे,हरिश्चंद्र डोंगरवार,नगरसेवक रामभाऊ वैद्य, शहराध्यक्ष सागर निरंकारी,महादेव पुंगळे,श्रीकांत नागीलवार,प्रा.विनोद नागपूरकर,मंगेश मांडवे,रोशन सय्यद व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -

