Friday, September 11, 2026
Homeगडचिरोलीयेत्या १० मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..

येत्या १० मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक रा.जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली येथे येत्या,शनिवार १० मे २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची लोकअदालत जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली, अहेरी,आरमोरी,चामोर्शी,देसाईगंज, धानोरा,कुरखेडा आणि सिरोंचा येथील तालुका न्यायालयांमध्ये होणार आहे.राष्ट्रीय लोकअदालतीत गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र फौजदारी आणि दिवाणी प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने तडजोडीद्वारे निकाली काढली जाणार आहेत.यामध्ये फौजदारी आणि दिवाणी दावे,कलम १३८ एन.आय.ॲक्ट प्रकरणे,भूसंपादन, कौटुंबिक वाद,मोटार वाहन अपघात दावे,बँक,टेलिफोन, मोबाइल कंपनी,महाराष्ट्र राज्य वीज वितरण,पतसंस्था, नगर परिषद आणि ग्रामपंचायत कर आकारणीशी संबंधित प्रकरणांचा समावेश आहे.लोकअदालतीद्वारे प्रकरणे जलद निकाली निघत असल्याने पक्षकारांचा वेळ,श्रम आणि पैशांची बचत होते.तसेच दोन्ही पक्षकारांमधील वैर कमी होऊन मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतात. लोकअदालतीत पारित अवॉर्डची अंमलबजावणी न्यायालयाच्या हुकुमाप्रमाणे केली जाते.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे अध्यक्ष,सचिव आर.आर.पाटील आणि सर्व सदस्यांनी पक्षकार,अधिवक्ते आणि नागरिकांना या लोकअदालतीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्याचे आवाहन केले आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!