Saturday, May 30, 2026
Homeदेसाईगंजसुनील पारधी यांचेकडे दुसऱ्यांदा भाजपा देसाईगंज तालुकाध्यक्षपदाची धुरा..!

सुनील पारधी यांचेकडे दुसऱ्यांदा भाजपा देसाईगंज तालुकाध्यक्षपदाची धुरा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-सामाजिक,राजकीय व इतर क्षेत्रात दांडगा अनुभव असणारे गोर-गरीब,सर्वसामान्य
जनतेसाठी सदैव झटणारे,मृदभाषी,मनमिळावू स्वभाव,सामाजिक कार्यात हिरीहिरीने भाग घेणारे सुनील पारधी यांचेकडे परत दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाच्या देसाईगंज तालुकाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे.तर भाजपच्या देसाईगंज शहराध्यक्षपदी सचिन खरकाटे यांचीही दुसऱ्यांदा सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.भाजपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,माजी आमदार कृष्णा गजबे, किसन नागदेवे,जिल्हा महामंत्री सारडा सदानंद कुथे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा,गीताताई हिंगे व पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आज,सोमवार २१ एप्रिल रोजी पार पडलेल्या बैठकीत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने दर तीन वर्षांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येतात.सर्वप्रथम प्रतिष्ठित मान्यवर,पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात येत असते. बैठकीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांची सर्वानुमते निवड केली जाते.अश्याच प्रकारची बैठक आज सोमवारी देसाईगंज शहरात पार पडली.त्यानुसार मागील तीन वर्षांपासून अविरत सामाजिक कार्य तथा पक्ष संघटन यामध्ये मोलाची भूमिका बजावल्याने दोन्ही पदाधिकाऱ्यांना सर्वानुमते पुनश्च एकदा सुनील पारधी यांना देसाईगंज तालुकाध्यक्षपद तर सचिन खरकाटे यांना देसाईगंज शहराध्यक्ष पूर्वपदावर विराजमान करण्यात आले. सदरच्या निवडीमुळे पुन्हा एकदा पक्ष संघटनात्मक बळकटीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला.यावेळी प्रामुख्याने जिल्ह्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!