Thursday, September 3, 2026
Homeनागपूरकाळाने झडप घातली आणि एका क्षणात आनंदावर पडले विरजण.. - दोनदा...

काळाने झडप घातली आणि एका क्षणात आनंदावर पडले विरजण.. – दोनदा कार उलटून खड्ड्यात कोसळली; आई-वडीलांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मोठी मुलगी ॲक्सिस बँकेत नोकरीला,तर मुलाचे येत्या,रविवार २७ एप्रिलला लग्न ठरलेले आणि त्यात लहान मुलीला बीएएमएसची पदवी मिळाल्याने  अख्खे कुटुंब आनंदात होते.परंतु काळाने झडप घातली आणि एका क्षणात अख्ख्या कुटुंबियांच्या आनंदावर विरजण पडले असल्याची घटना नागपूरच्या कोंढाळीनजीक सोनेगाव शिवारातील वळणावर काल, रविवारी २० एप्रिलला सायंकाळी ५ वाजता घडली.
भरत भोयर यांची लहान मुलगी ममता ही गरूकुल मोझरी येथिल वैद्यकीय महाविद्यालय शिक्षण घेत होती.काल रविवारी तिचा पदवीदान दिक्षांत सोहळा होता.त्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील भोयर कुटुंबीय सोहळा आटोपून परत येत होते.परत येतांना त्यांची अनियंत्रित कार दोन वेळा पलटी होऊन खड्ड्यात कोसळली.भीषण अपघातात कारमधील आई-वडिलांचा मृत्यू झाला.तर भाऊ व बहीण गंभीर जखमी झाले.भरत सुरजलाल भोयर वय ६५ वर्षे व लक्ष्मी भरत भोयर वय ६० वर्षे अशी अपघातात मृत्यू झालेल्या आई-वडिलांची नावे आहेत.तर शैलेश भरत भोयर वय ३४ वर्षे आणि सुश्मिता भरत भोयर वय २९ वर्षे सर्वजण रा.ता.लाखनी,जि.भंडारा अशी गंभीर जखमी झालेल्या बहीण-भावाची नावे आहेत.
माहितीनुसार,भरत भोयर यांची लहान मुलगी ममता हीने बीएएमएस पूर्ण केल्यामुळे तिचा मोझरी येथे पदवीदानचा(पदवी बहाल) समारंभ होता.या समारंभासाठी भोयर कुटुंबीय आपली वॅगनार कार क्रमांक एम.एच.३१ सी.आर-०२०१ ने लाखनी येथून मोझरीला गेले होते.पदवीदान समारंभ आटोपून भोयर कुटुंबीय लाखनीकडे परत येत होते.भरत यांचा मुलगा शैलेश कार चालवित होता.सुश्मिता त्याच्या बाजूला बसली होती.तर भरत आणि लक्ष्मी हे दोघे कारमध्ये मागच्या सीटवर बसले होते.परत येतांना काल रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कोंढाळीपासून २ किलोमीटर अंतरावरील सोनेगाव शिवारात भारत पेट्रोल पंपाजवळील वळणावर त्यांची कार अनियंत्रित झाली.अपघातात त्यांची कार दोन वेळा उलटून एका खड्यात कोसळली.यात कारची चारही चाके वर होऊन कारमध्ये भोयर कुटुंबीय अडकून पडले.घटनेची माहिती मिळताच कोंढाळीचे पोलिस उपनिरीक्षक धवल देशमुख ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले.त्यांच्यासह कोंढाळीतील सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड व स्थानिक तरुणांनी उलटलेली कार सरळ करून कारमधील जखमींना बाहेर काढले.त्यांना कोंढाळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.तेथे प्रथमोपचार केल्यानंतर कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.पूजा गायकवाड यांनी जखमींना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले.परंतु रस्त्यातच भरत आणि लक्ष्मी भोयर यांचा मृत्यू झाला.तर त्यांचा मुलगा शैलेश व मुलगी सुश्मिता गंभीर जखमी झाले आहेत.मुलीच्या पदवीदान समारंभाहून आनंदाने परत येताना भोयर कुटुंबावर काळाने घाला घातल्यामुळे लाखनी येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.भरत भोयर यांची गंभीर जखमी असलेली मोठी मुलगी सुश्मिता ही ॲक्सिस बँकेत नोकरीला आहे.तर मुलगा शैलेश याचे लग्न रविवारी २७ एप्रिलला ठरले आहे.ऐन आनंदाच्या क्षणीच काळाने झडप घातल्याने देवा इतका निष्ठुर कां?…
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!