उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या तापमानामुळे जीवाची लाहीलाही होत आहे.सूर्य देवता कोपला की काय? अशी अवस्था सर्वत्र दिसून येत आहे.हल्ली उष्णतेत एवढी वाढ झाली आहे की,घरातील सीलिंग पंखा तर सोडाच थंड हवा देणारा कुलरही गरमा-गरम हवा फेकू लागला आहे.अशातच तापमानाच्या वाढीत नागपूरला मागे टाकणारा चंद्रपूर शहर सलग दोन दिवस सर्वात हॉट ठरल्याचे दिसून येत आहे.काल,रविवारी चंद्रपुरात ४४.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली होती. तर आज,सोमवार २१ एप्रिलला चंद्रपूर शहराचे तापमान परत पुन्हा १ अंशाने वाढून ४५.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आल्याने चंद्रपूर देशातील सर्वात हॉट शहर ठरले आहे.त्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराच्या तापमानात वाढ होऊन आज सोमवारी ४५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आल्याने ब्रम्हपुरी शहर राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे.अशातच आज अमरावती ४४.६,अकोला ४४.१,नागपूर ४३.६,वर्धा ४३.४,यवतमाळ ४३.४,गडचिरोली ४३.०,वाशिम ४२.५,गोंदिया ४२.१,भंडारा ४१.४, तर बुलढाणा मध्ये ३९.८६ तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
आज रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद; चंद्रपूर देशात तर ब्रम्हपुरी राज्यात सर्वात हॉट..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

