Thursday, June 4, 2026
Homeभंडारारानडुकरासह वाघाचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू...

रानडुकरासह वाघाचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-एका रानडुकराचा शिकारीसाठी पाठलाग करणे वाघाला महागात पडले आहे.शिकार करता-करता चक्क वाघ आणि रानडुक्कर शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज,शुक्रवार १८ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चिखला येथे उघडकीस आली.
माहितीनुसार,चिखला येथील शेतकरी कवनलाल धुर्वे हे सकाळच्या सुमारास आपल्या शेतावर गेले होते.शेतातील विहिरीच्या पाण्याची पातळी पाहण्यासाठी विहिरीजवळ गेले असता,त्यांना विहिरीतील पाण्यात पट्टेदार वाघ व रानडुक्कर मृतावस्थेत आढळून आले.सदर घटनेची माहिती शेतकरी कवनलाल धुर्वे यांनी नाका डोंगरी वनपरीक्षेत्र कार्यालयास दिली.माहिती मिळताच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन वाघ व रानडुकराचे शव विहिरीबाहेर काढले.वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्या उपस्थितीत वाघाचे व रानडुकराचे शवविच्छेदन करून घटनास्थळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!