Thursday, September 3, 2026
Homeभंडाराचालत्या गाडीत चढतांना पाय घसरून रेल्वेखाली आल्याने शरीराचे दोन तुकडे..

चालत्या गाडीत चढतांना पाय घसरून रेल्वेखाली आल्याने शरीराचे दोन तुकडे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर रोड रेल्वेस्थानकावर भयावह घटना काल,बुधवार ९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली.रेल्वे प्रवासादरम्यान ४८ वर्षीय प्रवासी तुमसर रोड रेल्वेस्थानकावर पिण्याच्या पाण्याची बॉटल खरेदी करण्यासाठी उतरला. तितक्याच रेल्वेगाडी सुरू झाली.गाडी सुरू असतांनाच गाडीत चढता-चढता त्याचा पाय घसरून रेल्वेखाली आल्याने शरीराचे दोन तुकडे झाले.सदरची घटना तुमसर रोड रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक-१ वर घडली असून गोविंद कुमार वय ४८ वर्षे रा.गुडगाव (हरियाणा)असे रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे.निजामुद्दीन ते बिलासपूरकडे जाणाऱ्या गोंडवाना एक्स्प्रेस गाडीतून कुटुंबीयांसह दुर्ग येथे जात होते.प्रकरणी तुमसर रोड रेल्वे जीआरपीने गुन्हा दाखल केला.अपघाताच्या पंचनाम्यानंतर १५ मिनिटांनी रेल्वे पुढे निघाली. पोलिसांनी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले.दुपारनंतर नातेवाईक प्रेत घेऊन खाजगी वाहनाने दुर्गला रवाना झाले.घटनेचा पुढील तपास रेल्वे सुरक्षा बल करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!