Saturday, September 5, 2026
Homeभंडाराकाय सांगता? कुंपणानेच खाल्लाय शेत..! बनावट पंचनामे करून पूरग्रस्त शेतकऱ्यांची रक्कम तलाठी,कोतवाल...

काय सांगता? कुंपणानेच खाल्लाय शेत..! बनावट पंचनामे करून पूरग्रस्त शेतकऱ्यांची रक्कम तलाठी,कोतवाल आणि पोलीस पाटलाने हडपली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात एक खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.पुरबाधित शेतकऱ्यांचे बनावट पंचनामे तयार करून शासनाची रक्कम तलाठी,कोतवाल आणि पोलीस पाटलाने हडप केली.सदरचे प्रकरण गावातीलच काही शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून समोर आले आहे.सरकार आणि शेतकऱ्यांमधला दुवा म्हणून काम करणाऱ्या प्रशासनातीलच महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांनी सदरचा प्रकार केल्याने कुंपणानेच शेत खाल्ल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.
माहितीनुसार,सप्टेंबर २०२४ मध्ये आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा लाभ उचलण्यासाठी सहा शेतकऱ्यांनी तलाठी,कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने बनावट पंचनामे तयार करून राज्य सरकारकडून मिळणाऱ्या पूरग्रस्तांचा आर्थिक मोबदला उचलला.सदरचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील सुकळी नकुल या गावात उघडकीस आला आहे.ही धक्कादायक बाब गावातीलच काही शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून समोर आली.पूरग्रस्ताची ही मदत उचलण्यासाठी  सहा शेतकऱ्यांनी पंचनामे करणाऱ्या पथकाला त्यांची शेती त्यांच्या पत्नीच्या नावाने असल्याची पंचनाम्यात नोंद केली आणि ती रक्कम डीबीटीच्या(थेट लाभ हस्तांतरण)माध्यमातून बँक खात्यात वळती करून उचल केली.ग्रामस्थांच्या तक्रारीवरून तुमसरचे तहसीलदार मोहन टिकले यांनी फेर चौकशी केली असता,त्यात ही बाब खरी असल्याचे उघडकीस आले.याचा संपूर्ण चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करणार असल्याची माहिती तुमसरचे तहसीलदार यांनी दिली.सदर प्रकरणी तलाठी,कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्यावर आता काय कारवाई केली जाणार,याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!