Thursday, September 3, 2026
Homeनागपूरविजय वडेट्टीवारांना न्यायलयाने समन्स बजावून २५ एप्रिलपर्यंत मागवले उत्तर.. - निवडणूक कालावधीतील...

विजय वडेट्टीवारांना न्यायलयाने समन्स बजावून २५ एप्रिलपर्यंत मागवले उत्तर.. – निवडणूक कालावधीतील प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समन्स बजावला असून येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी त्यांना याबाबत न्यायालयात उत्तर सादर करा,असे म्हटले आहे.
वडेट्टीवार यांचा नामनिर्देशन अर्ज व प्रतिज्ञापत्र आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने स्टॅम्प पेपर वापरणे यासंदर्भात बेकायदेशीर काम करण्यात आल्याचा दावा करीत न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली.ब्रम्हपुरी येथील परिवर्तन महाशक्ती संयुक्त आघाडी,स्वाभिमानी पक्ष,स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार ॲड.नारायण जांभुळे यांनी ही याचिका दाखल केली.या प्रकरणावर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्यासमक्ष सुनावणी झाली.याचिकेनुसार,ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले.वडेट्टीवार यांनी दाखल केलेल्या या प्रतिज्ञापत्रात वापरलेला स्टॅम्प पेपर त्यांच्या नावाचा नसून,त्यांच्या पत्नीच्या नावे आहे.वडेट्टीवार यांच्या पत्नीने हा स्टॅम्प पेपर ‘करारनामा’ साठी घेतला होता.मात्र,स्टॅम्प पेपरचा वापर नव्या अक्षरात ‘प्रॉमिसरी नोट’ लिहून विधानसभा निवडणुकीत विजय वडेट्टीवार यांनी स्वतःच्या उमेदवारीसाठी करण्यात आला.ही घटनात्मक फसवणूक असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला.एका व्यक्तीच्या नावाने खरेदी केलेला स्टॅम्प पेपर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर वापरता येत नाही.त्यामुळे वडेट्टीवार यांचे प्रतिज्ञापत्र अवैध ठरवण्यात यावे व त्यांची नामनिर्देशन याचिका रद्द करावी,अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.वडेट्टीवार यांना न्यायालयात २५ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करायचे आहे.त्यामुळे उत्तर समाधानकारक असणार की नाही,वडेट्टीवार यांची आमदारकी शाबूत राहणार की नाही,अश्या चर्चांना उधाण आले असून,पुढील येत्या काळात कळणार आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड.जांभुळे यांनी स्वतः बाजू मांडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!