- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना ठरलेल्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी शासनाच्या वित्त विभागाकडून ३ हजार ४९० कोटी रुपये २० फेब्रुवारीला वर्ग करण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केली होती.त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होणार असल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले होते.अशातच आता लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता प्रलंबित असल्याची कारणे समोर आली आहेत.राज्यात सध्या लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे. महत्वाचे म्हणजे,लाडक्या बहिणीकडे चारचाकी वाहने आहेत का? याची पडताळणी महिला व बालकल्याण विभागाकडून होत आहे.या पडताळणीस विलंब होत असल्याने लाडक्या बहिणींचा निधी थांबला आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांची पडताळणी तात्काळ करावे,असे आदेश महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुप यादव यांनी दिले आहेत.
राज्याच्या एकट्या सोलापूर जिल्ह्यात सुमारे अकरा लाखांपेक्षा जास्त महिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी आहेत.त्यापैकी जिल्ह्यातील साडेबारा हजार महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहने असल्याची यादी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाली आहे.त्यानुसार जिल्ह्यातील चारचाकी वाहनांची पडताळणी अंगणवाडी सेविका करीत आहेत.मात्र,या पडताळणीस विलंब लागत असल्याने महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुप यादव हे सातत्याने व्हिसीद्वारे पडताळणी पूर्ण करण्याच्या सूचना देत आहेत.अशातच विधानसभा निवडणूक असतांना कुठल्याही प्रकारचे निकष न लावता,सर्वांना लाडक्या बहिणी मानून लाभ देण्यात आला.मात्र,आता हे ना ते निकष लादून लाडक्या बहिणी कपात करण्याचा फंडा सुरू असल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जातो आहे.
- Advertisement -

