Saturday, September 5, 2026
Homeभंडारा४० हजाराची लाच भोवली; पाणीपुरवठा विभागातील अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

४० हजाराची लाच भोवली; पाणीपुरवठा विभागातील अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-तडजोडी अंती ४० हजाराची लाच घेतांना
भंडारा जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागात कार्यरत कनिष्ठ अभियंत्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.सदरची कारवाई  आज,शुक्रवारी २८ फेब्रुवारीला करण्यात आली.सुहास पांडुरंग करेंजकर वय ५१ वर्षे असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
माहितीनुसार,करेंजकर हे भंडारा जिल्हा परिषदेत पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत आहेत.जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून आरओ प्लान्ट बसविण्यात आले होते.त्या कामाचे ९ लाख ८० हजार रुपयांचे बिल थकले होते.१७ फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांनी करंजेकर याला भेटून त्यांच्या बिलाबाबत विचारणा केली असता त्याने बिलावर सही करून बिल मंजूर करण्यासाठी बिलाच्या पाच टक्के रक्कम, ४९ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.कंत्राटदाराने याची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीवरून २५ फेबुरवारी रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आरोपी करंजेकर याने तडजोडअंती ४० हजार रुपयांची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार आज शुक्रवारी सापळा कारवाई दरम्यान आरोपी सुहास करंजेकर याने पंचासमक्ष कंत्राटदाराकडून ४० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली.त्याच्याविरोधात भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू करण्यात आले.तसेच त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!