Friday, July 31, 2026
Homeचंद्रपूरपोलिसांनी सट्टा-पट्टी धारकांच्या आवळल्या मुसक्या.. - सट्टा-पट्टी धारकांकडून ४ लाख २२ हजाराचा...

पोलिसांनी सट्टा-पट्टी धारकांच्या आवळल्या मुसक्या.. – सट्टा-पट्टी धारकांकडून ४ लाख २२ हजाराचा ऐवज हस्तगत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत आज, शनिवार १५ फेब्रुवारीला सट्टा-पट्टी धारकांच्या मुसक्या आवळून १२ आरोपींना ताब्यात घेत ११ गुन्हे दाखल करीत एकूण ४ लाख २२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदरच्या कारवाईने सट्टा-पट्टी धारकांचे धाबे दणाणले आहेत.

दिवसेंदिवस अवैध धंदे वाढीस लागल्याने यावर कुठेतरी आळा घातला जावा,यासाठी पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांनी चंद्रपुर जिल्हात जुगार,प्रोव्हीशन रेड तसेच अवैध धंद्यावर कारवाईकरण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपुर यांना दिले.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने पथक गठीत करून वरोरा शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैधरित्या सट्टापट्टीवर वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सट्टापट्टी चालविणाऱ्या एकुण १२ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेवर वरोरा पोलीस स्टेशन येथे वेगवेगळे ११ गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून नगदी रूपये २२ हजार ८२० रुपये व ८ मोटार सायकल किंमत ४ लाख रुपये असा एकूण ४ लाख २२ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर,पोलीस उपनिरीक्षक विनोद भूरले, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकार, पोलीस उपनिरीक्षक सुनिल गौरकार व पोलीस स्टॉफ सर्व स्थानिक गुन्हे शाख, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!