- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका ३६ वर्षीय कृषी
सहाय्यकाला १ हजाराची लाच घेतांना काल, मंगळवारी ४ फेब्रुवारीला रंगेहाथ पकडुन अटक करण्यात आली आहे.सरजीव बोरकर वय ३६ वर्षे असे अटक करण्यात आलेल्या कृषी सहाय्यकाचे नाव आहे.
माहितीनुसार,तक्रारदार शेतकरी मौजा माजरी-कॉलरी ता.भद्रावती,जि.चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांची नंदोरी येथे शेती आहे.शेतीस फवारणी करीता महाडिबीटी योजनेअंतर्गत बॅटरी स्प्रे पंपासाठी त्यांनी
सप्टेंबर २०२४ मध्ये अर्ज केला होता.त्यानुसार बॅटरी स्प्रे पंप सप्टेंबर २०२४ मध्येच मंजूर करण्यात आला व ७ ऑक्टोंबर २०२४ रोजी कृषी विभागामार्फत इतर शेतकऱ्यांना स्प्रे पंपाचे वाटप करण्यात आले होते. परंतु तक्रारदार बाहेरगावी असल्याने स्प्रे पंप मिळू शकले नाही.त्यामुळे तक्रारदाराने तालुका कृषी अधिकारी कार्यालय भद्रावती येथे जावून कृषी सहाय्यक सरजीव अजाबराव बोरकर यांची भेट घेतली असता कृषी स्प्रे पंप देण्यासाठी टाळाटाळ केली मात्र,सोमवारी ३ फेब्रुवारीला त्यांनी तक्रारदार यांना फोन करून बॅटरी स्प्रे पंप देण्यासाठी १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.याबाबत तक्रारदार शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.त्यानुसार काल मंगळवारी सापळा रचून कृषी सहाय्यकास अटक करण्यात आली आहे.
- Advertisement -

