Saturday, June 20, 2026
Homeचंद्रपूरकुख्यात वाघ तस्करासह चार महिलांच्या वनकोठडीत वाढ...

कुख्यात वाघ तस्करासह चार महिलांच्या वनकोठडीत वाढ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असणाऱ्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला २७ जानेवारीला चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आली होती.बहेलिया टोळी ही मध्य प्रदेशातील टोळी आहे.अजित राजगोंड हा टोळीचा म्होरक्या असून टोळीतील आणखी चार महिलांना अटक करण्यात आली आहे.त्यानुसार आता कुख्यात वाघ तस्कर अजित राजगोंड आणि त्याच्यासोबत असलेल्या चार महिलांची वनकोठडी जेएमएफसी राजुरा न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यत वाढवली आहे.या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पर्यावरण मंत्रालय,वन आणि हवामान बदल विभाग आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नियुक्त केलेल्या विशेष कार्य दलाचे (एसटीएफ) एक पथक चंद्रपुरात तर दुसरे पथक मध्य प्रदेशातील कटनी येथे दाखल झाले आहे.तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.मेघालयच्या शिलाँगमधून अटक करण्यात आलेला माजी सैनिक लालनेईसंग आणि अजित राजगोंड यांच्यात सुमारे २० लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.या व्यवहारांतर्गत किमान ९ ते १० वाघांचे अवयव पाठवण्यात आल्याची शंका आहे.लालनेईसंगने हे अवयव चीन आणि थायलंडमध्ये पुरवल्याचीही माहिती समोर येत आहे.अजित राजगोंडचा गुन्हेगारी इतिहास गंभीर आहे.२०१५ मध्ये त्याला तिरुपती येथून अटक करण्यात आली होती आणि सीबीआयने त्याला शिक्षाही सुनावली होती.सप्टेंबर २०२३ मध्ये तो जामिनावर सुटला होता.२०१३-१४ मध्ये मेळघाट येथे २० ते २५ वाघांच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!