Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंज१०० मीटर दौड स्पर्धेत किन्हाळ्याची काजल भर्रे नागपूर विभागातून प्रथम... - देसाईगंज...

१०० मीटर दौड स्पर्धेत किन्हाळ्याची काजल भर्रे नागपूर विभागातून प्रथम… – देसाईगंज इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत नागपूर विभागात येणाऱ्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा आज,मंगळवार ४ फेब्रुवारी पासून प्रादेशिक कार्यालय नागपूर व संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्या वतीने धनवटे नॅशनल कॉलेज,काँग्रेस नगर नागपूरच्या क्रीडांगणात सुरु झाल्या असून नागपूर विभागात येणाऱ्या गडचिरोली,गोंदिया, चंद्रपूर,भंडारा,वर्धा,व नागपूर या सहा जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी स्पर्धकांनी यात भाग घेतलेला आहे.त्यानुसार आज,मंगळवार ४ फेब्रुवारीला झालेल्या विभागीय १०० मीटर दौड स्पर्धेत देसाईगंज इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनी काजल शंकर भर्रे (वायरमन प्रशिक्षणार्थी) नागपूर विभागातून प्रथम आली.तर २०० मीटर दौड स्पर्धेत नागपूर विभागातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.काजल भर्रे ही देसाईगंज तालुक्याच्या किन्हाळा(मोहटोला)येथील रहिवासी असून यशाचे श्रेय तिने आई,वडील व क्रीडा प्रशिक्षिका माया जाधव (प्रभारी गटनिनिर्देशिका) यांना दिले आहे.
तिच्या या यशाबद्दल देसाईगंज इंदुताई नाकाडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी, गटनिर्देशक रविकांत गोतमारे,चंद्रशेखर गरमळे एन.एस.एस.समन्वयक,शिक्षक व्ही.वाय.नागमोती,
गुणवंत वांढरे,दामोधर अंबादे,डी.सी.बोकडे,गजानन ठाकरे,राकेश भोयर,आदर्श भोले,चंदू समर्थ,एम. वाय.कापगते सह संस्थेतील सर्व कर्मचारी वृंदांनी
 प्रशिक्षणार्थीचे कौतुक करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!