Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीरिपाईला संपविण्याचे काम भाजप,कांग्रेसवाले करीत असून दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी-प्रा.मुनिश्वर बोरकर

रिपाईला संपविण्याचे काम भाजप,कांग्रेसवाले करीत असून दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी-प्रा.मुनिश्वर बोरकर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली:-रिपब्लिकन पार्टी साबुत ठेवणे काळाची गरज आहे.यापूर्वी रिपाईचा दबदबा होता,आताच्या रिपब्लिकन चळवळीच्या अनेक गटातटामुळे रिपाई नष्ठ होणार काय? अशी भिती वाटू लागली आहे. रिपाईला संपविण्याचे काम भाजप,कांग्रेसवाले करीत असून दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत.रिपाई कडून फक्त मताचा जोगवा मागतात व नंतर रिपाईला दुय्यम वागणुक देतात.तेव्हा आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टीला बळ देऊन रिपाई मजबुत करण्याचा प्रयत्न करूया,तेव्हा तमाम आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्तांनी एकजुटीने रिपब्लिकन पक्ष वाचविणे काळाची गरज आहे; असे परखड मत रिपब्लिकन पक्षाच्या आरमोरी येथील मेळाव्या प्रसंगी रिपाईला गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी केले.

आरमोरी येथील डॉ.बाबा साहेब आंबेडकर भवन येथे पार पडलेल्या रिपाई मेळाव्याचे कार्याध्यक्ष मुर्लीधर भानारकर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन रिपाई नेते प्रा.मुनिश्वर बोरकर गडचिरोली रिपाई जिल्हाध्यक्ष, गोपाल रायपूरे चंद्रपूर,नासीर ज्जुमन शेख,पक्ष प्रवक्ता अशोक शामकुळे,रिपाई महिला आघाडीच्या नेत्या ॲड.प्रियंका चव्हाण बल्लारशा,उपाध्यक्ष सोनू साखरे, महासचिव परसराम बांबोळे,उपाध्यक्ष मारोती भैसारे, कुरखेडा तालुकाध्यक्ष सुनिल सहारे,मोहनदास मेश्राम, सचिन किरणापूरे,टि.एम.खोब्रागडे,आरमोरी तालुकाध्यक्ष राजेंद्र ठवरे,देवेंद्र बोदेले,शामराव सहारे,गडचिरोली तालुकाध्यक्ष जिवन मेश्राम आदिंची प्रमुख उपस्थिती लाभली होती.याप्रसंगी गोपाल रायपूरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जोमाने रेटून रिपाईची ताकद वाढविण्याचे काम सर्वांनी एकजुटीने केले पाहिजे,तेव्हा रिपाईला जुने दिवस दिसणार,असे गोपाल रायपूरे यांनी सांगितले.याप्रसंगी ॲड.चव्हाण, नासिर शेख यांचेही समायोचित भाषणे झालीत. याप्रसंगी मुर्लीधर भानारकर यांनी पक्ष कार्यकर्ता म्हणून सर्वप्रथम समाजकारण व नंतर राजकारण करीत गोरगरीबांच्या समस्या जाणुन घेऊन इतरांचे प्रश्न सोडविण्यास आम्ही नेहमीच तत्पर असतो.सदर कार्यक्रमाचे संचलन विजय शेंन्डे तर आभार शामराव सहारे यांनी मानले.कार्यक्रमास हर्ष साखरे,दिनेश बनकर,युवराज धंदरे,किशोर टिचकुले,बाळू टेंभुर्णे,राजाराम लोखंडे,जर्नाधन राऊत, सुरेश बोरकर,हेमंत डोंगरे,मनोहर अंबादे,आबाजी शेन्डे,टिकाराम टेंभुर्णे,हिरामण इंदुरकर,चोखोबा ढवळे,सतिश टेंभुर्णे,डाकराम टेंभुर्णे,निर्मला रामटेके,वर्षा ठवरे,सुनिता इंदुरकर,भाग्यश्री चौधरी,ताराबाई भानारकर, वंदना चव्हाण आदि सहीत जिल्ह्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थिती होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!