Monday, July 27, 2026
Homeभंडाराअन् संतप्त ग्रामस्थांनी चौकातील भर रस्त्यावर मृतदेह ठेऊन सुरू केला ठिय्या आंदोलन...

अन् संतप्त ग्रामस्थांनी चौकातील भर रस्त्यावर मृतदेह ठेऊन सुरू केला ठिय्या आंदोलन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली बूज येथील महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉक्टरांवर जोपर्यंत कारवाई होणार नाही,तोपर्यंत मृतदेह हलणार नाही; असा आक्रमक पावित्रा कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी घेत चौकातील भर रस्त्यावरच महिलेचा मृतदेह ठेऊन ठिय्या आंदोलन सुरू केला आहे.मेघा आकाश बनारसे,असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,लाखांदूर तालुक्याच्या विरली बूज येथील मेघा आकाश बनारसे या महीलेची काही महिन्यांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र  सरांडी बूज या ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला पुढील उपचाराकरीता भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.त्यानुसार कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात दाखल करून काही दिवसांत सुट्टी घेतली.प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने भंडारा रुग्णालयात वारंवार जावे लागले.सुधारणा न झाल्याने परत ब्रम्हपुरीच्या खासगी रुग्णालयात दोनदा शात्रक्रिया करण्यात आल्या.शत्रक्रिया केल्यानंतरही प्रकृती आणखी खालावल्याने नागपूरच्या मेडिकल मध्ये काल, शनिवारी १८ जानेवारीला भरती करण्यात आले. त्यानुसार उपचार सुरू असतांना मेघाची प्राणज्योत मावळली.मेघाच्या मृत्यूची बातमी गावकऱ्यांना कळताच गावकऱ्यांनी आज,रविवार १९ जानेवारीला मेघाचा मृतदेह घेऊन चौकातील भर रस्त्यावरच शेकडो महिला-पुरुषांनी रास्ता रोको सुरू करून ठिय्या आंदोलन पुकारले आहे.जोपर्यंत दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार नाही,तोपर्यंत जाग्याहून हलणार नाही; असा पावित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!