Wednesday, September 23, 2026
Homeचंद्रपूरअज्ञाताकडून नोकरीसाठी फ्रॉड कॉल; तरुणीने पुण्यावरून गाठले नागभीड...

अज्ञाताकडून नोकरीसाठी फ्रॉड कॉल; तरुणीने पुण्यावरून गाठले नागभीड…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-तुमची घोडाझरी अभयारण्यात निवड झाली आहे.मुलाखतीसाठी आपल्याला ९ जानेवारी २०२५ रोजी नागभीड तालुक्यातील घोडाझरी अभयारण्यात हजर राहायचे आहे; अशी एका अज्ञात व्यक्तीकडून बतावणी करण्यात आली.या बतावणीला बळी पडलेल्या या तरुणीने पुण्यावरून सरळ नागभीड गाठले.आणि नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने कपाळावर हात मारून घेतल्याची घटना काल बुधवारी नागभीड येथे उघडकीस आली.
पूजा संतोष राजगुरू असे या तरुणीचे नाव असून,ती पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील रहिवासी आहे.वनरक्षक पदासाठी तिने यापूर्वी पुणे विभागात अर्ज केला होता.नेमक्या या संधीचा फायदा घेत एका भामट्याने तरुणीला ऑक्टोंबर महिन्यात फोन करून तुमची निवड घोडाझरी अभयारण्यात झाली आहे, तुम्ही गणवेश खरेदी करून प्रशिक्षणास हजर राहा, असे फोन करून सांगितले.मात्र,एक-दोन दिवसातच आचारसंहितेमुळे तुमचे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले आहे,अशी माहिती या व्यक्तीने तरुणीला फोनवरूनच दिली.दरम्यान,४ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा या तरुणीला त्याच व्यक्तीकडून फोन आला. आता आचारसंहिता संपली आहे,तुम्हाला ९ जानेवारीला घोडाझरीत प्रशिक्षणास हजर राहायचे आहे,असे सांगितले.विश्वास ठेवत ही तरूणी पुण्यावरून थेट नागभीड येथे पोहचली.येथे येऊन अधिकाऱ्यांना विचारणा केली असता,असे कोणतेही प्रशिक्षण नसल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर तिने कपाळावर हात मारून घेतला.
अजय नेरलवार,वन क्षेत्र सहाय्यक,नागभीड👇
तरूणी आपल्या पतीसोबत नागभीडच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात काल,बुधवारी सकाळी आली आणि प्रशिक्षणाबाबत विचारू लागली.मात्र,असे कोणतेही प्रशिक्षण नसल्याची माहिती आमच्या कार्यालयाकडून देण्यात आली.त्यानंतर ती परत गेली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!