Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजनायलॉन मांजा आढळुन आल्यास कडक कारवाई करणार- देसाईगंज तहसीलदार प्रिती डूडूलकर

नायलॉन मांजा आढळुन आल्यास कडक कारवाई करणार- देसाईगंज तहसीलदार प्रिती डूडूलकर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-नवीन वर्षाला नुकतीच सुरुवात झाली असून अवघ्या काही दिवसांवर ‘तीळ गुळ घ्या अन् गोड गोड बोला’ सण म्हणजेच मकर संक्रांतीचा सण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.सणाच्या अगोदर पासूनच सगळीकडे मोठ्या प्रमाणावर लहानांनपासून ते मोठ्यांपर्यंत पतंग उडवीत असतात.अशातच पतंग उडविण्यासाठी सुती धाग्या ऐवजी नायलॉन मांजा धाग्यांचा वापर केला जातो. नायलॉन मांजा धाग्यांचा वापर केल्यामुळे अनेक ठिकाणी विविध अनुचित प्रकार घडून गळा चिरणे,हात कापणे व इतर घटना उघडकीस आल्या आहेत.त्यामुळे एखादेवेळी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.अशातच कृत्रिम सिंथेटीक नायलॉन मांजाची साठवणूक करून विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.त्यामुळे शहरात वा इतर ठिकाणी असे प्रकार दिसून आल्यास तात्काळ निर्बंध लादण्याचे आदेश देसाईगंजच्या तहसिलदार प्रिती डूडूलकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या बैठकित पारित केले आहे.त्यामुळे नायलॉन मांजा आढळुन आल्यास कडक कारवाई करणार असल्याचे बैठकी प्रसंगी सांगितले आहे.
सदर बैठकीस देसाईगंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक मनिष गोडबोले,नायब तहसिलदार धात्रक,नगर परिषदेचे पाणि पुरवठा अभियंता आशिष गेडाम यांचेसह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!