Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजकोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा होतो व प्रशासनाकडून एक डकारही घेतली जात...

कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा होतो व प्रशासनाकडून एक डकारही घेतली जात नाही.. -अखेर कोट्यवधी रुपयांच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू… – आंदोलनस्थळी राकाँचे तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांची भेट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा होतो व प्रशासनाकडून एक डकारही घेतली जात नाही; याला काय म्हणावे.गावकरी,ग्रामपंचायत, सुजाण नागरिकांनी तक्रारी,गाऱ्हाणे मांडूनही मुंग गिळून पापड खाणे कितपत योग्य आहे; खरं तर अवैध वाळू उपसा होतांना प्रशासनाने काय केले? याचा उलगडा होणे आवश्यक असल्याने आज,सोमवार ३० डिसेंबर पासून देसाईगंज तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन नामदेव वसाके यांचे सह सत्यवान रामटेके यांनी सुरू केले आहे.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट)देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके तसेच सामाजिक कार्यकर्ते नरेश वासनिक यांनी आंदोलनस्थळी भेट देत संबंधितांवर योग्य ती कारवाई लवकरात-लवकर व्हावी; यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रसंगी आंदोलन कर्त्यांनी म्हटले की,एकीकडे बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पाच ब्रास वाळूसाठी हा कागद आणा,त्या घाटातून वाळू द्यायची नाही,मोफत वाळू कशी काय मिळणार?  त्यांची नोंद ठेवा,असे नाना तऱ्हेचे नियम लादले जातात.याउलट वाळू चोरट्यांना नदी पात्रातील सारे रान मोकळे केले जातात; हा कुठला न्याय आहे. आमचा जन्मही झाला नसेल त्या काळापासून कोंढाळा-मेंढा वैनगंगा नदी पात्रात रेतीचा साठा तयार झालेला आहे.वाळूचे एक कण तयार व्हायला जवळपास दीड ते दोन वर्ष लागतात.मात्र,आजची स्थिती बघता नदी पात्रातील रेतीची पुरती वाट लागली आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपशावर प्रशासनाची एकदाही नजर न जाणे ही किती लाजिरवाणी बाब आहे.अवैध वाळू उपशाच्या माध्यमातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.यांस जबाबदार कोण? चोर चोऱ्या करतात,तो त्यांचा कामच आहे; पण त्यावर आवर घालणारी व्यक्तीही त्यांची साथीदार असेल तर ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ असे म्हणावेच लागेल. अनेकजण म्हणू लागलेत की,आजपर्यंत तुम्ही काय केलेत..! आम्ही काय केलेत म्हणण्यापेक्षा प्रशासनाने त्यावर उपाययोजना काय केल्यात?हेही तितकेच महत्त्वाचे आहे.आम्ही गाऱ्हाणी सांगून तक्रारी केल्या.पण त्या तक्रारींचे झाले काय? कागदाचे पान पलटलेच नाही; त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी आमची लढाई सुरू असणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!