- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघ,वाघीण,बिबट व इतर हिंस्त्र प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे.हिंस्त्र प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेकरी बांधवांसह परिसरातील गावकरी धास्तावले आहेत.प्राण्यांच्या हल्ल्यात मानवी जीवन पैश्यात तोलले जाऊ लागले आहे.त्यामुळे मानवाचे जीवन प्राण्यांपेक्षा सस्ते झाल्याचे दिसून येत आहे.अशातच मुक्त संचार करणारा बिबट्या आव- डाव पाहून मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर कधी झडप घालतो तर कधी दुचाकीचा प्रवास करणाऱ्यांचा पाठलाग करीत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिक भयभीत झाले आहेत.चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र नवरगावातील नाचनभट्टी बिटअंतर्गत नाचनभट्टी येथून गुरुवारी सायंकाळी रत्नापूरचे डॉ.हर्षद रामटेके हे दुचाकीने एकटेच नवरगावला जात होते.दरम्यान,पोल्ट्री फार्मजवळ अगदी रस्त्याच्या कडेला शेतात दडून बसलेल्या बिबट्याने दुचाकीजवळ येताच झडप घेतली.त्यामुळे डॉ.रामटेके यांनी वेळीच स्वतःला सावरुन कट मारली व दुचाकीचा वेग वाढविला.तरीही काही अंतरावर बिबट्याने पाठलाग केला.अश्याच प्रकारे काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावरून नत्थूजी चौधरी हे दुचाकीने जात असतांना नाचनभट्टी स्मशानभूमीजवळ बिबट्याने त्यांच्या पायाला ओढून जखमी केले होते.तसेच गडबोरी येथील एक व्यक्ती नवरगाव येथून कार्यक्रम आटोपून रात्री गावाकडे जात असतांना त्याचाही पाठलाग केला होता.हा बिबट याच परिसरात मागील काही महिण्यांपासून संचार करून सतत हल्ले करीत असल्याने शेतकरी तसेच नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा; अशी मागणी केली जात आहे.
- Advertisement -

