Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरतुम्हाला लाल चंदन बघायचेय? तर मग चला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात... - लाल...

तुम्हाला लाल चंदन बघायचेय? तर मग चला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात… – लाल चंदनाचे एक नाही तर तब्बल तीन वृक्ष..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-लाल चंदन बहुगुणी वृक्ष आहे.त्यापासून विविध कॉस्मेटिक प्रोडक्ट्स बनविले जातात.पुष्पा भाऊच्या दाक्षिणात्य चित्रपटाने लाल चंदन प्रसिद्धीच्या झोतात आले.लाल चंदनाच्या अनेक रंजक कथाही प्रसिद्ध झाल्या होत्या.या चंदनाची किंमत कोट्यवधीच्या घरात असल्याचे सांगण्यात येते.अशा बहुमूल्य लाल चंदनाचे वृक्ष ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात असल्याची माहिती पुढे आली आहे.एक नाही तर तब्बल तीन वृक्ष असल्याची माहिती मोहुर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिली आहे.
ताडोबातील मोहुर्ली वनपरिक्षेत्रात वन विभागाचे विश्रामगृह परिसरातच लाल चंदनाचे वृक्ष उभे आहे. या तिन्ही झाडांची आम्ही योग्य पद्धतीने निगा राखतो अशीही माहिती त्यांनी दिली.ताडोबात अनेक वर्षांपासून लाल चंदनाचे वृक्ष आहे.अनेकांना याबाबत पुरेशी कल्पना नाही.अनेकांना तर ताडोबात लाल चंदनाचे वृक्ष आहे याचीही माहिती नाही.विशेष निगा राखण्यासाठी तेथे एक चबुतरा केला आहे; तसेच झाडावर त्याचे नाव देखील लिहिले आहे.
ताडोबाच्या जंगलात येणारे पर्यटक तसेच वन्यजीव अभ्यासक येथे लाल चंदन आहे काय? अशी विचारणा करतात,तसेच ताडोबात येणारा पर्यटक लाल चंदनाचा वृक्ष बघूनच ताडोबा प्रकल्पाच्या बाहेर पडतो. ताडोबातील वाघांचे जसे पर्यटकांना आकर्षण आहे तसेच आता लाल चंदनाचे झाडही आकर्षणाचा विषय बनला आहे.पुष्पा चित्रपटानंतर आता या वृक्षांना बघणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!