Saturday, May 2, 2026
Homeभंडाराबाव्वा रे...! सुरुवातीला पकडले अन् नंतर सोडले.. - अवैध रेतीचे टिप्पर सोडणारा...

बाव्वा रे…! सुरुवातीला पकडले अन् नंतर सोडले.. – अवैध रेतीचे टिप्पर सोडणारा ‘तो’ पोलीस कर्मचारी कोण?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-मागील गेली दोन ते तीन वर्षांपासून रेती घाट लिलाव प्रक्रिया रखडल्याने अवैध रेती चोरट्यांनी  धुमाकूळ घातला आहे.अवैधरित्या रेती चोरी करणाऱ्या चोरट्यांसह अधिकारी,कर्मचारीही मालामाल होत असल्याने अंगाला हळद न लावता रेती चोरांवर पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होतांना दिसून येत नाही.अशातच भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध रेती तस्करीवर आळा घातला जावा; यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांना कारवाईसाठी आदेशित केले आहे.मात्र,भंडारा जिल्ह्याच्या लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वरील मिलन ढाबा येथे वेगळाच प्रकार दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी ६ डिसेंबरच्या दुपारी उघडकीस आला आहे.चक्क
अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले अन् सोडून देण्यात आल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाची अवहेलना करणारा ‘तो’ पोलिस कर्मचारी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भंडारा जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात अवैध रेती वाहतूक बिनबोभाटपणे सुरू आहे.नदीपात्रातून रेती माफियांकडून रात्रंदिवस रेती उपसा व वाहतूक सुरू असल्याची माहिती संबंधित विभागाला आहे.पण वरची कमाई बंद होण्याच्या भीतीपोटी पूर्णकालीक उपाययोजना केली जात नाही.अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर किंवा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर दिसल्यास रेती माफियाशी मांडवली करून स्वतःचा आर्थिक लाभ करून कसलीही कारवाई न करता वाहन सोडले जाते.या प्रकाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली दाखविली जात असल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर त्वरित आळा घातला जावा; अशी मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!