Monday, July 20, 2026
Homeचंद्रपूरजिल्हा परिषद शाळेतील विषबाधा प्रकरणी आमदार सुधीर मुनगंटीवारांकडून सखोल चौकशी करण्याचे निर्देश......

जिल्हा परिषद शाळेतील विषबाधा प्रकरणी आमदार सुधीर मुनगंटीवारांकडून सखोल चौकशी करण्याचे निर्देश… – १२६ विद्यार्थ्यांना दिले होते उकडलेले चणे तिखट-मीठ लावून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-सावली तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली.बुधवारी ४ डिसेंबरला शालेय पोषण आहारामध्ये १२६ विद्यार्थ्यांना उकडलेले चणे,तिखट- मीठ लावून दिले होते; परंतु दिलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळेस उलट्या,हगवण व ताप येणे सुरू झाले.परंतु व्हायरल फिव्हरची शक्यता वाटल्याने पालकांनी लक्ष दिले नाही.पोषण आहार खाल्ल्यानंतर त्यातील १०६ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली.सर्व बाधित विद्यार्थ्यांना सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.अपुऱ्या जागेअभावी काही विद्यार्थ्यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.ताप उतरत नसल्याने रात्री उशिरा २ विद्यार्थी चंद्रपूरला तर ५ विद्यार्थी गडचिरोलीला रेफर करण्यात आले.
पारडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये १३३ पटसंख्या असून गुरुवारी १२६ विद्यार्थी हजर होते.त्यातील सुरुवातीला ८० विद्यार्थी व नंतर विषबाधा प्रकरणी आकडा वाढून १०६ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली.विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणातील सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत.सावली तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावे; अशाही सूचना आमदार मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.संपुर्ण प्रकरणाची निःपक्ष चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुनगंटीवार यांनी दिले आहेत.रुग्णालयात भरती विद्यार्थांना उत्तम उपचार मिळावे; यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष द्यावे; असेही निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

९० किलो प्रतिबंधित तंबाखूसह ७ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका चारचाकी वाहनाने मध्य प्रदेशच्या पांढुर्णा येथून सावनेर मार्गे नागपूरच्या दिशेने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या सावनेर तालुक्याच्या केळवद पोलिसांनी...

शाखा अभियंत्याच्या निलंबनानंतर आता ग्रामसेवक निलंबित.. – गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कारवाईचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मनमानीचा कारभार करू पाहणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्याने जिल्हा...

विविध गावात दहशत माजवणारी वाघीण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील विविध गावात दहशत माजवणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.विशेष म्हणजे,वाघिणीने समुद्रपूर तालुक्याच्या पिंपळगाव,उंदीरगाव,साखरा,...

अखेर उद्या होणारा डॉक्टरांचा राज्यव्यापी संप मागे; आरोग्य सेवा राहणार सुरळीत..

उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA) महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!