आरमोरी(गडचिरोली):-शाळेतील मुलींना वाईट स्पर्श करणाऱ्या आरमोरी येथील सीताबर्डी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शिक्षक चंद्रभान बांबोळे वय ५० वर्षे याला आरमोरी पोलिसांनी अटक केली आहे.शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या शिक्षकाला कडक शिक्षा द्यावी; अशी मागणी पालकांनी होती.चंद्रभान बांबोळे हा चौथ्या वर्गाचा वर्गशिक्षक असून मुलींच्या खांद्यावर हात ठेवणे, कमरेत हात घालणे,मुलींच्या खांद्यावर स्वतःचे डोके ठेवणे,खाऊ देऊन मुलींची पप्पी घेणे; अशा प्रकारचे असभ्य वर्तन वर्गातच करीत होता.त्याचे हे वर्तन बघून काही मुली दुसऱ्या वर्गामध्ये जाऊन बसत होत्या.
शाळेतील मुलींना वाईट स्पर्श करणाऱ्या शिक्षकासह मुख्याध्यापिकेचेही निलंबन.. -आरमोरी शाळेतील प्रकरण…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक चंद्रभान बांबोळे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४ सहकलम १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.त्यानुसार त्याला
शिक्षण विभागाने त्याला निलंबित केले आहे.तसेच शाळेत होत असलेल्या गैरवर्तनाबाबत वरिष्ठांना कळवण्यात कसूर केल्याबद्दल मुख्याध्यापिका दिलेश्वरी दामोधर कोटांगले यांनाही शिक्षण विभागाने निलंबित केले आहे.महत्वाचे म्हणजे,चंद्रभान बांबोळे आरोपी शिक्षकाची मुख्य नियुक्ती ठाणेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील आहे.मात्र,गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्याला आरमोरी शहरातील सीताबर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत पदस्थापना दिली.यापूर्वीही त्याने असाच प्रकार इतर शाळेत केलाय कां? याबाबत आरमोरी पोलीस प्रशासन त्या दिशेने तपास करीत आहेत.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

