Thursday, August 27, 2026
Homeचंद्रपूरस्वतःच्या घरी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल... - चार पिडीत महिलांची...

स्वतःच्या घरी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल… – चार पिडीत महिलांची सुटका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.१५ ऑक्टोंबर पासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी, जुगार प्रतिबंध,प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू तसेच इतर अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरीता पोलीस स्टेशन रामनगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने काल,शनिवारी २६ ऑक्टोंबर रोजी गस्त सुरू असताना शहरात एक महिला वेश्याव्यवसाय चालवित असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली.त्यानुसार
स्त्रीया व मूली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम अन्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार,पोउपनि संतोष निभोरकर,महिला व पुरुष अंमलदार,समाजसेविका श्रीमती सरिता राजेद्र मालु यांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून छापा टाकला.त्यात  तैबुल फातिमा अब्दुल रफीक शेख,रा.जुनोना चौक, चंद्रपूर या दलाल महिलेवर कारवाई करण्यात आली व रामनगर पोलीस स्टेशन येथे स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तसेच चार पिडीत महिलांची सुटका करून त्यांना स्वाधारगृहात दाखल करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!