- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-घरी आयोजित एका कार्यक्रमानिमित्त भाजी बनवली होती.उरलेली भाजी घरातील फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्यावर एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्याच्या सरांडी येथे उघडकीस आली.
ताराबाई मुखरू कुंभरे वय ६५ वर्षे,शालिनी रमेश कुंभरे वय ४० वर्षे,गोवर्धन मुखरू कुंभरे वय ५२ वर्षे, सुजिता रमेश कुंभरे वय १४ वर्षे,दुर्गा रमेश कुंभरे वय ११ अशी विषबाधा झालेल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.ताराबाई कुंभरे यांच्या घरी गुरुवारी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांतर्गत त्यांनी उडदाच्या डाळीच्या पानवड्याची भाजी बनविली होती.कार्यक्रमानंतर घरातील सर्वांनी जेवण करून उरलेली भाजी घरातील फ्रीजमध्ये ठेवली होती.
सकाळच्या सुमारास फ्रीजमध्ये ठेवलेली भाजी गरम करून कुटुंबीयांनी खाल्ली.मात्र,सायंकाळच्या सुमारास पाचही जणांची प्रकृती खालावली.यामुळे त्यांना सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.मात्र,रात्रभरात कुणालाही आराम न झाल्याने या सर्वांना काल, शनिवारी २६ ऑक्टोंबरला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेची माहिती होताच सहायक पोलिस निरीक्षक आशिष गंद्रे, हवालदार गोपाल कोसरे आदी पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
सध्या पाचही जणांवर लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कुटुंबप्रमुख ताराबाई यांची प्रकृती वयोमानानुसार गंभीर असून उर्वरित ४ जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.
- Advertisement -

