Wednesday, August 26, 2026
Homeचंद्रपूरफेसबुकवरील व्हिडिओ पाहणे उच्चशिक्षित शिक्षिकेला पडला महागात; ३१ लाख रुपयांना चुना...

फेसबुकवरील व्हिडिओ पाहणे उच्चशिक्षित शिक्षिकेला पडला महागात; ३१ लाख रुपयांना चुना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-मोबाइलवर घरी बसून आनलॉइन पैसे कमवा, या आशयाचा व्हिडीओ पाहणे उच्चशिक्षित शिक्षिकेला महागात पडले.या व्हिडीओच्या माध्यमातून संबंधित शिक्षिकेला तब्बल ३१ लाख १५ हजार २२० रुपयांचा ऑनलाईन चुना लागल्याने, परीसरात खळबळ उडाली आहे.पीडित शिक्षिकेने याची तक्रार बल्लारपूर पोलिस स्टेशन येथे दाखल केल्याने सदर प्रकरण गुरूवारी उजेडात आले.
संबधित महिला उच्च शिक्षित असून,त्यांनी २१ मे ते २० ऑगस्ट दरम्यान फेसबुकचा वापर करीत असतांना,त्यांना घरी बसल्या पैसे कमवा असा व्हिडीओ दिसुन आला.त्यावेळी तिने सदर व्हिडीओ पाहुन व्हिडिओमध्ये सांगीतल्याप्रमाणे टेलीग्रॉम चॅनल फालो केले.त्यात तिला फॅशन संबंधीत कपडे,ज्वेलरी आणि इतर सामान यांचे व्हिडीओ बघुन स्क्रीन शॉट पाठविणे याबदल्यात प्रत्येकी स्क्रीन शॉट ५० रू.प्रमाणे टॉस्क देण्यात आले.त्यानंतर फिर्यादीने एकुण १२ टॉस्क पुर्ण केले.त्याचे काही पैसे फिर्यादीने देवुन तिचा विश्वास संपादन केला.त्यानंतर १३ टॉस्क पेड टास्क असल्याचे सांगुन तिला १२ हजार रुपये पाठविण्यास सांगितले.त्यानंतर लगातार तिला तुमचे अकाऊंटला होल्ड लागले आहे.अनफ्रिज करण्यासाठी पैश्याची मागणी केली.त्यानंतर तिने पाठविलेली रक्कम जास्त असल्याचे सांगुन तिला सायबर पोलिस ठाणे तसेच इन्कम टॅक्सची धमकी देवुन तिची फसवणुक करून वारंवार तिच्याकडुन पैसे घेवुन २७ लाख ६० हजार ९८० रुपयांची आर्थिक फसवणुक केली.त्यानंतर तिला ४ हजार ८०० डॉलर पाठविले आहे.त्याचे भारतीय रूपयामध्ये बदली करण्यास ४ हजार रुपये लागेल,असे सांगुन तिच्याकडून रक्कम पाठविण्यास भाग पाडले.नंतर तिला धमकी दिली की, तुमच्यावर मनी लॉन्ड्रीग,ब्लॅक मनीची पोलिस केस होईल.याची भिती दाखवुन ३ लाख ५४ हजार २२० रुपये अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या घटनेत एकुण ३१ लाख १५ हजार २२० रुपयाची फसवणक केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!