Friday, September 4, 2026
Homeभंडारा२६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.. - घरीच लाकडी मयालीला गळफास...

२६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल.. – घरीच लाकडी मयालीला गळफास घेऊन केली आत्महत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील तावशी गावातील एका २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने घरीच लाकडी मयालीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी रात्री ९ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.नितीन देवचंद राखडे रा. तावशी असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव असून शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची? या मानसिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केली आहे.
नितीन हा अल्पभूधारक शेतकरी होता.दीड एकर शेतीतून उत्पन्न घेत होता.त्यासाठी त्याला शेतीसाठी  बँक तसेच सोसायटीकडून कर्ज घ्यावे लागले.दोन वर्षांपासून कर्ज कुठून फेडावे या विवंचनेत होता.त्यातच उधार उसने करून रब्बी धान पिकाची लागवड केली.मात्र,वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतीला सिंचन करणे शक्य नव्हते.वातावरण बदलाचाही शेतपिकाला फटका बसल्याने रोगराईने धान पीकही फस्त झाले.त्यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची.या विवंचनेत होता.गुरुवारी १० एप्रिलच्या रात्री नितीनने घरीच लाकडी मयालीला स्वतःच्या दुपट्ट्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.वडील स्वयंपाक खोलीत गेले असता,त्यांना नितीन गळफास लागलेल्या अवस्थेत आढळला.घटनेची माहिती मिळताच दिघोरी पोलिसांनी घटनास्थळ घाठून पंचनामा करून नितीनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला.घटनेचा पुढील तपास दिघोरी पोलिस करीत आहे.तरुण शेतकऱ्याने आत्महत्या करून जीवनयात्रा सपविल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!