Sunday, June 28, 2026
Homeमुंबईअमृत भारत स्टेशन योजना; महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट.. -...

अमृत भारत स्टेशन योजना; महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट.. – विदर्भासह राज्यातील विविध रेल्वे स्टेशनचा योजनेत समावेश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई/गडचिरोली :-भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत,अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली.महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री वैष्णव यांचे आभार मानले.
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज(वडसा) रेल्वे स्टेशनचा देखील या योजनेत समावेश असून त्यासाठी २०.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,दादर (मध्य आणि पश्चिम),अंधेरी,टिळक टर्मिनस,पुणे,नाशिक रोड, नागपूर,छत्रपती संभाजीनगर,कोल्हापूर,परभणी, सोलापूर,सातारा,सांगली,अमरावती,भुसावळ इत्यादी. तसेच उपनगरीय आणि ग्रामीण भागातील अनेक स्थानकांनाही यात स्थान देण्यात आले आहे,जसे की, अक्कलकोट रोड,दौंड,इगतपुरी,चांदा फोर्ट,मालाड, डोंबिवली,चिंचवड इत्यादींचा समोवश आहे.
या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स,स्वच्छतागृहे,लिफ्ट्स,एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत.तसेच स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.
पुनर्विकास रेल्वे स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी👇
अजनी स्टेशन (२९७.८ कोटी),नागपूर जं.(५८९ कोटी),नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जं. (१७.४ कोटी),जालना (१८९ कोटी),छत्रपती संभाजीनगर (२४१ कोटी), रोटेगाव (१२ कोटी),अहिल्यानगर (३१ कोटी),भायखळा (३५.५ कोटी),चिंचपोकळी (५२ कोटी),चर्नी रोड (२३ कोटी),छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल(१८१३ कोटी),ग्रॅट रोड (२७ कोटी), लोअर परेल (३० कोटी),मरिन लाईन्स (२७.७ कोटी), सॅण्डहर्स्ट रोड (१६.४ कोटी),मुर्तिजापूर स्टेशन (१३ कोटी),बडनेरा (३६.३ कोटी),बारामती (११.४ कोटी), दौंड (४४ कोटी),केडगाव (१२.५कोटी),परळी वैजनाथ (२५.७ कोटी),भंडारा रोड (७.७ कोटी),गोंदिया ४० कोटी),तुमसर रोड (११ कोटी),टिटवाळा (२५ कोटी),शेगाव (२९ कोटी),बल्लारशाह (३१.४ कोटी),चंद्रपूर (२५.५ कोटी),चांदा फोर्ट (१९.३ कोटी),धुळे (९.५कोटी), लासलगाव (१०.५ कोटी),मनमाड (४५ कोटी),नगरसोल (२०.३ कोटी),नांदगाव (२० कोटी),आमगाव (७.८ कोटी),देसाईगंज(वडसा) (२०.५ कोटी),हातकंणगले (६ कोटी),हिमायतनगर (४३ कोटी),हिंगोली डेक्कन (२१.५ कोटी),किनवट (२३ कोटी),चाळीसगाव (३५ कोटी),अंमळनेर (२९ कोटी),धरणगाव (२६ कोटी),पाचोरा जं.(२८ कोटी), दिवा (४५ कोटी),मुंब्रा (१५ कोटी),शहाड (८.४ कोटी), कोल्हापूर-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (४३ कोटी), लातूर (१९ कोटी),जेऊर (२० कोटी),कुर्डूवाडी जं. (२० कोटी),फलटण (१ कोटी),वाठर (८ कोटी), आकुर्डी (३४ कोटी),चिंचवड (२०.४ कोटी),देहू रोड स्टेशन (८.०५ कोटी),तळेगाव स्टेशन (४०.३४ कोटी),मालाड स्टेशन (१२.३२ कोटी),कुर्ला जं.स्टेशन (२८.८१ कोटी) कांजुरमार्ग स्टेशन (२७ कोटी), विद्याविहार स्टेशन (३२.८ कोटी), विक्रोळी स्टेशन (१९ कोटी), जोगेश्वरी स्टेशन (११९ कोटी),माटुंगा स्टेशन (१७.३ कोटी), परळ स्टेशन (१९.४ कोटी), प्रभादेवी (२१ कोटी), वडाळा स्टेशन (२३ कोटी), भोकर स्टेशन (११.३ कोटी), धर्माबाद स्टेशन (३० कोटी),मुखेड जं.स्टेशन (२३ कोटी),उमरी स्टेशन (८ कोटी), देवळाली स्टेशन (१०.५ कोटी), इगतपुरी स्टेशन (१२.५ कोटी),धाराशिव स्टेशन (२२ कोटी),गंगाखेड स्टेशन (१६ कोटी), मनवथ रोड स्टेशन (१२ कोटी), परभणी जं.स्टेशन (२६ कोटी),परतूर स्टेशन (२३ कोटी), पूर्णा जं.स्टेशन (२४ कोटी),सेलू स्‍टेशन (२३.२ कोटी), हडपसर स्टेशन (२५ कोटी), गोधनी स्टेशन (२९ कोटी),काटोल स्टेशन (२३.३ कोटी), कामठी स्टेशन (७.७ कोटी), नरखेड जं. स्टेशन (३७.६ कोटी),कराड स्टेशन (१२.५ कोटी),सांगली स्टेशन (२४.२ कोटी),लोणंद जं.स्टेशन (१०.५ कोटी),सातारा स्टेशन (३४.३ कोटी),बेलापूर स्टेशन (३२ कोटी), कोपरगाव स्टेशन (३० कोटी),सेवाग्राम स्टेशन (१८ कोटी), धामणगाव स्टेशन (१८ कोटी),हिंगणघाट स्टेशन (२२ कोटी),पुलगाव स्टेशन (१६.५ कोटी), उरूली स्टेशन (१३ कोटी),वाशिम स्टेशन (२०.३ कोटी), मलकापूर स्टेशन (१९ कोटी), नांदुरा स्टेशन १०.६ कोटी), रावेर स्टेशन (९.२ कोटी), सावदा स्टेशन (८.५ कोटी), दुधनी स्टेशन (२२ कोटी), पंढरपूर स्टेशन (४० कोटी), सोलापूर स्टेशन (५६ कोटी), नंदूरबार स्टेशन (१५ कोटी) आणि पालघर स्टेशन (१७.५ कोटी).
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला चुना.. – सायबर चोरट्यांनी ९ लाख ९७ हजार उडवले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल ९ लाख ९७ हजार ७८० रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी...

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!