Sunday, April 26, 2026
Homeभंडारा१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २१ वर्षीय तरुणावर पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्हा...

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २१ वर्षीय तरुणावर पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून २१ वर्षीय तरुणाने भंडारा येथे भेटण्यासाठी बोलावले व नंतर तिला एका ठिकाणी नेत अत्याचार केला.मुलीची आई मुलगी कुठे गेली म्हणून चिंतातुर झाली असतांनाच घरी परतताच जाब विचारला असता मुलीने आपबिती सांगितली. त्यानुसार पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून, अड्याळ पोलिसांनी फूस लावून पळवून नेणे, अत्याचार करणे यासह कलम १३७ (२),६४(१), ६५(१) भारतीय न्याय संहिता सहकलम ४, ६ पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.आरिफ अंकुश मेश्राम रा.कवडसी,ता.भंडारा असे आरोपी तरुणाचे नाव असून पवनी तालुक्याच्या अड्याळ पोलिसांनी अटक केली आहे.सदरची घटना रविवारी घडली.१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपी आरिफने भंडारा येथे बोलावून अत्याचार केला.नंतर तिला पुन्हा भंडारा बसस्टॉपवर सोडून दिले.आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर सदर प्रकार उघडकीस आला आणि तक्रार दाखल करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वेगातील रेतीने भरलेला ट्रॅक्टर उलटला अन् तरणेबांड पोरगा दगावला..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ट्रॅक्टरमध्ये रेती भरून रेतीची साठवणूक करण्यासाठी भरधाव वेगात निघालेला रेतीने भरलेला ट्रॅक्टर उलटला आणि चालत्या ट्रॅक्टरवरून खाली कोसळलेल्या चालकाच्या अंगावरून ट्रॅक्टरच्या...

पहिल्यांदा वाघिणीचा हल्ला; हल्ल्यात वनरक्षक गंभीर जखमी.. – अन् काही वेळातच ‘टी-८४’ वाघिणीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर शेतशिवार परिसरात आज,रविवार २६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली.विशेष म्हणजे,शेतशिवारात भटकंती करणाऱ्या...

दोन बहिणींच्या बँक खात्यावर ठेवले स्वतःचे नियंत्रण अन् तब्बल ४८ लाखावर मारला डल्ला.! – ठगबाज निघाला कुरखेडा तालुक्यातील..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका ठगबाजाने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोन बहिणींची तब्बल ४८ लाखाहून अधिकच्या रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली शहरात उघडकीस आला...

उद्यापासून कृषी केंद्र चालक बेमुदत संपावर..

उद्रेक न्युज वृत्त :-अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष आणि कृषी केंद्र चालकांची होणारी कुचंबणा याविरोधात राज्यातील कृषी केंद्र चालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!