Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरस्कार्पिओची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार ठार तर सहकारी गंभीर जखमी..

स्कार्पिओची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार ठार तर सहकारी गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-अपघातांचे प्रमाण सर्वत्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.आपण कितीही सतर्कता बाळगतो म्हटले तरीही समोरील वाहन चालक अपघात घडवून आणणार की नाही; याची शास्वती ही कमीच असते.असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे.चिमूर तालुक्यातील पोलीस स्टेशन भिसी अंतर्गत जांभुळघाट-भिसी-उमरेड महामार्गावरिल पारडपार फाट्याजवळ स्कार्पिओ कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला,तर एक इसम गंभीर जखमी झाल्याची घटना काल,रविवारी घडली.
माहितीनुसार,काल रविवार दुपारी मोटर सायकलवरून २८ वर्षीय अभिषेक अंकुश बारेकर हा एम एच ३४,टी ९२७६ ने आंबेनेरी वरून जांभुळघाटकडे जात होता. यावेळी पारडपार फाट्याजवळ स्कार्पिओ क़मांक एमएच २७ ए आर ७२५८ ची जबर धडक बसली. दुचाकीस्वार अभिषेक बारेकर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सहकारी प्रदीप दिलीप जांभुळे वय ३० वर्षे रा.आंबेनेरी हा गंभीर जखमी झाला.भिसी पोलीसांना अपघाताची माहिती होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृत्तदेह ताब्यात घेतला.मृतदेह शवविच्छेदनाकरिता व गंभीर जखमीला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय चिमुर येथे पाठविण्यात आले.गंभीर जखमी प्रदीप जांभुळे याला चिमूर येथून पुढील उपचाराकरिता नागपुरला हलविण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!