Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरसेवानिवृत्त केंद्रशाळा प्रमुखाचा खून; आरोपी अटकेत..

सेवानिवृत्त केंद्रशाळा प्रमुखाचा खून; आरोपी अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यात एका ६० वर्षीय माजी केंद्रशाळा प्रमुखाचा खून झाल्याची घटना काल शुक्रवाच्या रात्री घडली असून आज,शनिवार २७ सप्टेंबर रोजी सर्वत्र उघडकीस आली.सुनिल कालीदास गेडाम वय ६० वर्षे,रा.टेकाडी,ता.मूल, जि.चंद्रपूर असे खून झालेल्या सेवानिवृत्त केंद्रशाळा प्रमुखाचे नाव आहे.तर त्याच गावातील रहिवासी किस्मत मोहम्मद अली सय्यद वय २४ वर्षे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.सदरची हत्या ही हात उसनवारीने दिलेल्या पैश्याच्या वादातून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
मूल तालुक्याच्या टेकाडी येथील सुनिल गेडाम यांनी
काही महिन्यांपूर्वी आरोपी किस्मत मोहम्मद अली सय्यद यास ६ लाख रुपये हात उसनवारीने दिले होते.बरेच महिने लोटूनही दिलेली रक्कम परत मिळत नसल्याने सुनिल गेडाम यांनी आरोपीकडे रक्कम परत मिळण्याचा तगादा लावला होता.त्यामुळे आरोपी किस्मतने काल शुक्रवार २६ सप्टेंबरच्या रात्री काही काम असल्याचे सांगून सुनिल गेडाम यांना गावनजीक परिसरात नेले. तिथून मूल शहराच्या एमआयडीसी परिसरात जाताच दोघांमध्ये पैश्यावरून वाद झाला.वाद सुरू असतांनाच आरोपी किस्मत मोहम्मद अली सय्यदने सुनिल गेडाम यांच्या डोक्यात लोखंडी सळाखीने वार केला.यात सुनील गेडाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.मृत्यू होताच आरोपीने मृतदेह मरेगाव-टेकाडी मार्गावरील नाल्यात फेकून पसार झाला.रात्र होऊनही वडील घरी आले नसल्याने मुलाने मूल पोलिसांकडे मिसिंगची तक्रार दाखल केली.लागलीच पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली.दरम्यान,आकापूर गावाजवळ मृतकाची दुचाकी, मोबाईल,चष्मा व चप्पल आढळून आली.त्यानुसार मूल पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून किस्मत अलीला ताब्यात घेतले.त्याची विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी हिसका दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत खून केल्याचे सांगितले.त्यानुसार पोलिसांनी नाल्यात फेकलेला मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय मूल येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.प्रकरणी आरोपी किस्मत मोहम्मद अली सय्यद विरुद्ध मूल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले,मूल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुबोध वंजारी करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!