Friday, September 4, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा ग्रामपंचायत तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न..

कोंढाळा ग्रामपंचायत तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-मानवी शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी अतीमहत्वाचे अवयव ते म्हणजे नेत्र(डोळे). नेत्र सुदृढ तर संपूर्ण जग हे सोनेरी वाटत असते,अन्यथा संपूर्ण जग हे अंधकारमय झाल्यासारखे होत असते. केवळ नेत्र तपासणीसाठी इतर ठिकाणी १५० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागते. रोजची रोजी-रोटी करून कमाई करणाऱ्यांना सदरची रक्कम ही न परवडणारी असते.त्याचबरोबर वयोवृध्द वयोमानानुसार बाहेर ठिकाणी जाण्याचे टाळत असतात. सदरची बाब लक्षात घेता कोंढाळा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वतीने ग्रामस्थांकरीता आज,शनिवार २७ सप्टेंबरला सकाळी ९ वाजे ग्रामपंचायत सभागृहात मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिरात गावातील शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला.सकाळी सुरू झालेले शिबिर तब्बल आठ तास चालले.
श्री ऑप्टिकलचे संचालक आकाश रईकवार,बहादुरा चौक,उमरेड रोड,नागपूर यांनी मोफत नेत्र तपासणी शिबिरास मोलाचे योगदान दिले.यापूर्वीही त्यांनी अनेक ठिकाणी आयोजित शिबिरात मोफत नेत्र तपासणी शिबिरे राबविली असल्याचे सांगितले.शिबिरप्रसंगी कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,पोलीस पाटील किरण कुंभलवार,तंटामुक्त समिती अध्यक्ष हरिभाऊ पत्रे, ग्रामपंचायत सदस्य शेषराव नागमोती,सदस्या भूनेश्र्वरी गुरनुले,शिल्पा चौधरी,सामाजिक कार्यकर्ते धनपाल मिसार,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे,अरुण दुपारे,लंकेश बुराडे यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
मोफत नेत्र तपासणी तथा नंबरचे चष्मे करीता संपर्क👇

श्री ऑप्टिकल,आकाश रईकवार,बहादुरा चौक,उमरेड रोड,नागपूर

संपर्क क्रमांक- ८६२३९७५०२१,८८३०४२२१६१
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!