उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी,अंतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कच्चेपार बीट-दोन कक्ष क्रमांक २५४ मध्ये सरपणासाठी काड्या तोडण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना काल, सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.श्रीकृष्ण सदाशिव कोठेवार वय ५१ वर्ष रा.पळसगाव (जाट) असे मृतकाचे नाव आहे. श्रीकृष्ण सदाशिव कोठेवार साथीदारांसोबत जंगलातील कच्चेपार बीटामध्ये पहाटेच्या सुमारास सरपण गोळा करायला गेला होता.सरपण जमा करताना तो जंगलातील नाल्यालगत पाणवठ्यावर पोहोचला.समोर दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घालून श्रीकृष्णला जागीच ठार केले.घटनास्थळाजवळ असलेल्या साथीदारांनी आरडाओरड करून वाघाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला.मात्र, वाघाने मृतदेह १०० मीटरपर्यंत फरकटत नेले.या घटनेची माहिती वनविभागाला देताच सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक सिंदेवाही,के.डी.मसराम चमू घेऊन घटनास्थळी दाखल झाले.यावेळी वनरक्षक चौधरी,वनरक्षक चहांदे,पंडित मेकेवार,फुलझले, तोडसाम,व स्वाब संस्थेचे जिवेश सयाम, शुभम निकेशर, कैलास बोरकर, गोपाल कुंभले, यश कायरकर, मिनेश कुंभले,यावेळी घटनास्थळी पोहचले.सिंदेवाही पोलिसांना घटनेची माहिती दिली.त्यांनी मोक्का पंचनामा करून ग्रामीण आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

