Wednesday, September 2, 2026
Homeचंद्रपूरसमाजभूषण पुरस्काराने सुधीर मुनगंटीवार सन्मानित..

समाजभूषण पुरस्काराने सुधीर मुनगंटीवार सन्मानित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-परम पूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना जिल्हा चंद्रपूरच्या वतीने समाजभूषण समाजसुधारक वितरण कार्यक्रमाचे आयोजन  पोंभुर्णा येथील सुमन मंगल कार्यालयात पार पडले. यावेळी समाजहिताचे काम करणारे वने व सांस्कृतिकमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना परम पूज्य शेषराव महाराज प्रदेश महाराष्ट्र व चंद्रपूर जिल्हा व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने समाजभूषण सन्मानचिन्ह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन परम पूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर चार्लोस्कर यांच्या हस्ते पार पडले.प्रमुख पाहुणे म्हणून रामदास आदाते होते.यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील दारू व्यसनमुक्तीवर काम करणाऱ्या जिल्ह्यात लाखो लोक दारू व्यसनमुक्त करणाऱ्या शेकडो संघटनेचा समाजसुधारक सन्मानपत्र व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की,जिल्ह्यात जागोजागी दारूची दुकाने थाटली आहेत.दारू पिल्याने मनुष्य दानव होतो. मनुष्याला दानव करणारे काही नेते करीत असून ते सोन्याच्या पाटावर बसून आहेत.संघटनेच्या या ईश्वरीय पवित्र कामासाठी मी स्वतः संपूर्ण ताकदीने तनमनधनाने आपल्या सोबत असल्याचे वचन त्यांनी दिले.यशस्वीतेसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे,लक्ष्मीकांत धानोरकर,दिगंबर वासेकर,अविनाश राऊत, सुरज जिभकाटे,प्रकाश अल्गामकर,मारुती वाकुलकर,साईनाथ कुंनघाटकर, बाळू पिंपळशेंडे, गणपत चौधरी,बबन गुरनुले,राजू लडके,श्रीकृष्ण पिंपळकर,महादेव मांडवकर,भोजराज एकोनकर, सेलोरेसर,अरुण बावणे,गुलाब वाघधरे,उत्तम पारधी, भाऊजी चापडे आदींनी प्रयत्न केले.संचालक गुरुदेव चोपडे यांनी केले.कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातून नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!