Friday, September 4, 2026
Homeभंडारासदस्यांच्या तक्रारीवरून थेट सरपंच पदमुक्त..!

सदस्यांच्या तक्रारीवरून थेट सरपंच पदमुक्त..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-राज्यातील महायुती सरकारने गावगाडा हाकणाऱ्या मिनी मंत्रालयातील सरपंचाची निवड ही ग्रामपंचायत सदस्यांमधून न करता गावातील जनतेंनी थेट निवडून द्यावे,असे फर्मान सोडल्याने काही सरपंच सोडता इतर सरपंच हे उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता आपल्याच मनमर्जिने कामे करून गावगाडा हाकण्याचा प्रयत्न करू पाहतात.मात्र, थेट निवड झाली असली तरीही त्यावर काही मर्यादाही असतात.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सिहोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचा रंजना तूरकर यांनी सरपंच पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत विभागीय आयुक्तांनी पदमुक्त केले आहे.रंजना तूरकर या थेट सरपंचपदी निवडून आल्या होत्या.
सिहोरा ग्रामपंचायतीत ११ सदस्यांची बॉडी असून डिसेंबर २०२२ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक पार पडली होती.त्यावेळेस रंजना तूरकर या थेट सरपंचपदी निवडून आल्या होत्या.त्यानुसार सन २०२३ मध्ये ग्रामपंचायतीतर्फे विविध विकास कामे करण्यात आली.विकास कामे करीत असतांना इतर सदस्यांना विश्वासात न घेता नियमांना बगल देण्यात आले.विशेष म्हणजे,१५ वा वित्त आयोग निधी अंतर्गत साहित्य खरेदीत १ लाख ३७ हजार रुपये खर्च करण्यात आले. परंतु देयक अदा करतांना मासिक सभेत ठराव घेण्यात आला नाही.तसेच इतर नियम धाब्यावर बसविण्यात आल्याने सरपंच रंजना तूरकर यांच्या विरोधात उपसरपंच सलाम शेख,सदस्य महेश कामथे,प्रतीक घोडीचोर, चित्ररेखा सोनकुसरे,धनिका निनावे,वैशाली राऊत,लता दलाल,सविता नेवारे, कविता शरणागत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीची दखल घेत चौकशी करण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे चौकशीत सरपंच आणि सचिव यांनी ८८ लाख २४ हजार ६२४ रुपयांचा निधी खर्च करतांना नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून आले.प्रकरणी भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालावरून विभागीय आयुक्तांनी कारवाई करीत थेट सरपंचास पदमुक्त केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!