Wednesday, June 10, 2026
Homeभंडारासततच्या भांडणावरून मुलाने जन्मदातीचा केला खून..

सततच्या भांडणावरून मुलाने जन्मदातीचा केला खून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-सततच्या भांडणावरून मुलाने आपल्याच आईचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव जंगलात एका अज्ञात महिलेचा मृतदेह काल,गुरुवारी सकाळच्या सुमारास आढळून आला होता. मात्र, मृतदेहाची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांपुढे मोठे आवाहन होते.पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवताच महिलेची ओळख पटली.तपासाअंती महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.चित्रलेखा उर्फ रेखा अरूण वासनिक वय ४५ वर्षे,रा.दिघोरी मोठी,असे मृत महिलेचे नाव असून प्राथमिक तपासात महिलेचा खून करुन मृतदेह पोत्यात भरुन जंगलात फेकून दिल्याचे समोर आले.त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता, तिच्याच मुलाने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह प्लास्टीक पोत्यात भरुन १५ किलोमीटर लांब दांडेगावच्या जंगलात फेकून दिल्याचे निष्पन्न झाले.चित्रलेखासोबत मुलगा सुमित नेहमीच भांडण करीत होता.गेल्या चार महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या भांडणावरुन आई चित्रलेखाचा त्याने खून  केला.पोलिसांनी आरोपी सुमित अरूण वासनिक वय २५ वर्षे,रा.मोठी दिघोरी,याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!