Saturday, May 2, 2026
Homeगोंदियाशेतात जात असतांना कोंडा भरलेला ट्रक अचानक अंगावर उलटला; वृध्द जागीच ठार...

शेतात जात असतांना कोंडा भरलेला ट्रक अचानक अंगावर उलटला; वृध्द जागीच ठार – इसापूर इटखेडा येथील देसाईगंज ते कोहमारा राज्य मार्गावरील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-शेतात जात असतांना कोंडा भरलेला ट्रक अचानक अंगावर उलटल्याने त्याखाली दबून वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इसापूर इटखेडा येथील देसाईगंज(वडसा) ते कोहमारा या राज्य मार्गावरील टी पॉइंट जवळ काल,सोमवारी ९ डिसेंबरच्या दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली.वासुदेव विठोबा लांजेवार वय ६५ वर्षे असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
कोंडा भरलेला ट्रक क्रमांक- एमएच ४९-एटी ३२५९ हा देसाईगंज(वडसा)मार्गाकडे जात होता.तर वासुदेव लांजेवार हे आपल्या शेताकडे राज्य मार्गावरील इसापूर टी-पॉइंट चौकातून पायी जात होते व त्याच क्षणी कोंडा भरलेला ट्रक त्यांच्या अंगावर पडल्याने त्याखाली दबून ते जागीच ठार झाले.अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. ट्रकखाली दबलेल्या वासुदेव यांचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.याप्रकरणी मृताचा भाऊ देवराम विठोबा लांजेवार यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम २८१,१०६ (१) सहकलम मोटार वाहन कायदा १८४ अन्वये ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपघातग्रस्त ट्रक पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अश्विनी कदम करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!