नागपूर :-एक संतापदायक घटना नागपुरातील गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे. एका ७० वर्षीय सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने दुकानातून बीडी आणून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसाबद्दल तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.कवडू झुलुकी धुर्वे वय ७० वर्षे रा.गिट्टीखदान असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.कवडू हा मध्यप्रदेश पोलिसात कार्यरत होता. निवृत्तीनंतर तो गिट्टीखदान परिसरात रहायला आला.घटनेच्या दिवशी आरोपीने पिढीत १० व्या वर्गात शिकणाऱ्या १५ वर्षीय बालिकेला शुक्रवारी आवाज देऊन घरी बोलावले आणि जवळच असलेल्या दुकानातून बीडी आणून देण्यास सांगितले.वरिष्ठ नागरिकाची मदत करण्याच्या उद्देशाने पीडिता बीडी आणण्यासाठी गेली.बीडीचा कट्टा कवडूच्या हातात दिला आणि जाण्यासाठी निघाली. मात्र,कवडूने तिचा रस्ता अडवला आणि अश्लील चाळे करीत जबरजस्तिने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सदर घटनेने मुलगी अवाक् होऊन कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.पिढीत बालिका नेहमी कवडूच्या घराशेजारी राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी जात होती.त्यामुळे तिची कवडू याच्याशीही ओळख झाली होती.
दुकानातून बीडी आणून देण्याच्या बहाण्याने निवृत्त पोलिसाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

