Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरशेतकऱ्यास स्वतःची किडनी कां विकावी लागली? अनेक वर्षांपासून सुरू होता छळ..! -...

शेतकऱ्यास स्वतःची किडनी कां विकावी लागली? अनेक वर्षांपासून सुरू होता छळ..! – डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालातून उघड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील शेतकऱ्याची व्यथा ऐकून दगडलाही पाझर फुटेल अशी घटना मंगळवार १६ डिसेंबरला सर्वत्र उघडकीस आली.शेतकऱ्याने आपली व्यथा अनेकांजवळ कथन केली; पण त्यास वाचा फोडण्याचे काम कुणीही केले नाही.अखेर विविध प्रसारमाध्यमांनी मुद्दा उचलून धरला आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. घटनेने सर्वजण अवाक् झाले आणि प्रशासन पुढे सरसावले.प्रकरणी अवैध सावकारी करणाऱ्या पाच जणांना ब्रम्हपुरी शहरातून अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.तर एकजण अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
रोशन शिवदास कुळे वय ३५ वर्षे,रा.मिंथूर, ता.नागभीड, जि.चंद्रपूर असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे.रोशन कुळे या पीडित शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करण्यासाठी काही गायी खरेदी केल्या. मात्र,काही कालावधीपूर्वी लम्पी आजाराने काही जनावरे दगावल्याने व्यवसाय तोट्यात गेला.अडचणीत सापडलेल्या रोशनने ब्रम्हपुरीतील काही अवैध सावकारांकडून १ लाख रुपयाचे कर्ज घेतले.मात्र,चार ते पाच जणांच्या टोळीने अवाढव्य व्याज आकारत दमदाटी सुरू केली.अवैध सावकारांनी १ लाख रुपयांचा आकडा व्याजासह ७४ लाखांपर्यंत नेला.हे कर्ज फेडण्यासाठी रोशनने दुचाकी,ट्रॅक्टर,साडेतीन एकर शेतीही विकली; मात्र व्याजाचा डोंगर वाढतच राहिला.इतकेच नव्हे,तर पैशासाठी अश्लील शिवीगाळ,मारहाणीसह अमानुष क्रूर कृत्य करण्यात आले.२१ मार्च २०२१ पासून हा प्रकार सुरू होता.यानंतर सावकारांकडून ४० ते ६० टक्क्यांपर्यंत व्याजाची रक्कम आकारण्यात आली.७४ लाखाची रक्कम कशी परतफेड करायची? या विवंचनेत असतांना किडनी विकण्याचा निर्णय घेतला आणि कंबोडिया देशातील नानपेन शहरात ८ लाखांमध्ये डाव्या बाजूची किडनी विकली.पीडित शेतकऱ्याने किडनी विकल्याचा दावा केल्याने त्यांची चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी करण्यात आली.अहवालातून डाव्या बाजूची किडनी काढण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालातून उघड झाले आहे.या प्रकरणात सहा जणांविरुद्ध ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात कलम १२० ब,३२६,३४२,२९४,३८७,५०६, ३४ भांदवि सहकलम ३९,४४,महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अन्वये मंगळवारी रात्री ७ वाजता गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.किशोर रामभाऊ बावनकुळे वय ४२ वर्षे,रा.कुर्झा,ब्रम्हपुरी,लक्ष्मण पुंडलिक उरकुडे वय ४७ वर्षे,रा.पटेल नगर,ब्रम्हपुरी,प्रदीप रामभाऊ बावनकुळे वय ३८ वर्षे,रा.देलनवाडी,ब्रम्हपुरी,संजय विठोबा बल्लारपुरे वय ५० वर्षे,रा.फवारा चौक,पटेलनगर,ब्रम्हपुरी,सत्यवान रामरतन बोरकर वय ५० वर्षे,रा.टेकरी,ता.सिंदेवाही, हल्ली मुक्काम चांदगाव रोड,दोनोडे यांचे घरी, ब्रम्हपुरी यांचा समावेश आहे.तर आरोपी मनिष पुरुषोत्तम घाटबांधे वय ४२ वर्षे रा.पटेलनगर,ब्रम्हपुरी हा अद्याप फरार आहे.वरील पाचही आरोपींना काल बुधवारी  ब्रम्हपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची म्हणजेच २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.पोलीस कोठडीमुळे आणखी काही प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!