Sunday, July 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तन्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याचे ई-मेल; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर..

न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याचे ई-मेल; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई तसेच उपराजधानी नागपूर येथील न्यायालयांना आज,गुरुवार १८ डिसेंबरला बॉम्बने उडवून देण्याची धमकी असणारे ‘ई-मेल’ न्यायालय प्रशासनास मिळताच परिसरात एकच खळबळ माजली.मुंबईतील वांद्रे न्यायालय तर नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका ई-मेलद्वारे देण्यात आली.सुरक्षेच्या दृष्टीने वांद्रे न्यायालय परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात कसून तपासणी करण्यात आली.न्यायालयात उपस्थित असलेल्या नागरिकांना सतर्क करण्यात आले.काही तास चाललेल्या तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळून आले नाही.अश्याच प्रकारे नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा ई-मेल हा मुंबईहून पाठविण्यात आला होता.मुंबईहून पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये आयएसआय(ISI)चा उल्लेख करण्यात आला होता.दुपारी दोनच्या सुमारास बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती.धमकीनंतर नागपूर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात तातडीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.बॉम्ब निरोधक पथकाकडून संपूर्ण न्यायालय परिसराची झाडाझडती घेण्यात आली. सुदैवाने येथेही कोणतेही स्फोटक आढळून आले नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.दरम्यान, पोलिसांनी धमकीचा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला,कोणी पाठवला आणि त्यामागील उद्देश काय?  याचा तपास सुरू केला आहे. यासाठी सायबर सेलच्या मदतीने ई-मेलचा स्रोत,आयपी ॲड्रेस आणि तांत्रिक माहिती तपासली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध गावात दहशत माजवणारी वाघीण जेरबंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील विविध गावात दहशत माजवणाऱ्या वाघिणीला पकडण्यात वनविभागास यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.विशेष म्हणजे,वाघिणीने समुद्रपूर तालुक्याच्या पिंपळगाव,उंदीरगाव,साखरा,...

अखेर उद्या होणारा डॉक्टरांचा राज्यव्यापी संप मागे; आरोग्य सेवा राहणार सुरळीत..

उद्रेक न्युज वृत्त :-ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA) महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा...

गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयांवर आमदार मसरामांची मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी नुकतीच गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांची  सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील वने,वन्यजीव व शेतकऱ्यांशी संबंधित विविध...

जोरदार पावसाचा नवा अंदाज; पुढील पाच दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच प्रादेशिक हवामान विभागाने पावसाचा सुधारित अंदाज वर्तविला होता.त्यानुसार,१५ जुलैपासून महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली.विशेषतः १६ जुलैपासून विदर्भात पावसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!