Friday, September 11, 2026
Homeभंडाराशिक्षक भरती प्रक्रिया बंद असतांना शिक्षकांची नियुक्ती; मुख्याध्यापकासह शिक्षकांची चौकशी..

शिक्षक भरती प्रक्रिया बंद असतांना शिक्षकांची नियुक्ती; मुख्याध्यापकासह शिक्षकांची चौकशी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-बनावट शालार्थ आयडी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळाप्रकरणी उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह कार्यालयातील लिपिक,इतर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती.सायबर पोलिसांनी दाखल गुन्ह्यात पुन्हा नरड यांना अटक केली.माजी उपसंचालक अनिल पारधी, वैशाली जामदार आणि प्रभारी उपसंचालक चिंतामण वंजारी यांनाही अटक झाली आहे.यांना अटक होताच भंडारा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे भूमिगत झाले.तेव्हापासून त्यांनी कार्यालयात पाय ठेवले नाही. असे असतांना त्यांच्याकडील पदभार काढण्यात आला आणि आता तर त्यांची कार्यालयीन बदली सुध्दा गडचिरोली जिल्ह्यात झाल्याचे पुढे येत आहे.या सबंध प्रकरणाची चौकशी सुरू असतांना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील शाळेत वर्ष २०१७ ला शिक्षक भरती प्रक्रिया बंद असतांना शिक्षकाची नियुक्ती केल्याचे आढळून आल्याने या विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह तीन शिक्षक चौकशीच्या भोवऱ्यात आले असल्याचे शिक्षण विभागात दबक्या आवाजात बोलले जात आहे. मुख्याध्यापकासह तीन शिक्षकांची चौकशी करिता शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी चौकशी समिती गठित केली होती.मात्र,त्या चौकशी समितीवर झालेल्या बदल्यांचा तसेच सेवानिवृत्तीचा प्रभाव झाल्याने सदर समिती पुनर्गठित करण्याची वेळ आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऐन सणाच्या दिवशीच दुर्दैवी घटना..! आयशर ट्रक आणि ट्रॅक्सचा भीषण अपघात; आठ जणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-ऐन तान्हा पोळा सणाच्या दिवशीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास...

माता व नवजात बालिकेचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश.. – मातामृत्यू कमी करण्यासाठी वेळेवर नोंदणी व उपचार घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील कालीअम्मल हॉस्पिटल येथे अतिजोखमीच्या गर्भधारणेतील अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या प्रकरणात वेळेवर निदान,रक्तघटकांचा पुरवठा,आवश्यक उपचार व तातडीची...

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!