Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीशेतकरी उत्पादक कंपन्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न..

शेतकरी उत्पादक कंपन्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपली प्रगती साधण्यासाठी इतर यशस्वी शेतकऱ्यांच्या ‘सक्सेस स्टोरी’ तून प्रेरणा घेत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले.गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सक्षमीकरणासाठी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)व कृषी विभाग,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज,गुरुवार १२ जून रोजी नियोजन भवन येथे करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून गावंडे बोलत होते.आत्माच्या प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे,झाडीपट्टी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक चंद्रशेखर भडांगे,कोयतूर शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक बाळू मडावी, स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी अर्चना कोचरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.शेतकरी उत्पादक कंपन्यांना उद्योगाचा दर्जा देण्यात आला असून शासनाच्या विविध परवानग्या,त्रुटी व अडचणी  ‘एक खिडकी’ योजनेतून वेळेत मार्गी लावण्याचे व यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातही आता ‘उद्योजक मदत कक्ष’ स्थापन करण्यात आला असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी गावंडे यांनी सांगितले.
प्रीती हिरळकर यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत कार्यशाळेच्या आयोजनाची माहिती दिली व कृषी व संलग्न विभागांच्या विविध योजनांचा लाभ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी घेण्याचे सांगितले.निलेश गायकवाड यांनी उद्योग केंद्रातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली आणि प्रशिक्षण उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.प्रशांत धोंगळे यांनी बँकिंग वित्त व कर्ज प्रक्रियेतील अडचणींवर प्रकाश टाकला.शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी भडांगे व मडावी यांनी कंपन्यांना काम करतांना येणाऱ्या अडचणी मांडल्या,त्यावर तज्ज्ञांनी योग्य मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले.
कार्यशाळेत नायब तहसीलदार हेमंत मोहरे यांनी भाडेपट्टी करार,कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक परवानग्या यावर मार्गदर्शन केले.उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी विविध योजनांची माहिती ऑनलाइन पद्धतीने दिली.डॉ.संदीप क-हाळे, सहाय्यक प्राध्यापक,कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, अकोला यांनी भात व मका पिकातील उत्पादनवाढीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन,किड व रोग नियंत्रण व कृषी अवजारे बँक याविषयी मार्गदर्शन केले.प्रविण सेलोकर यांनी एफपीओसाठी आवश्यक परवाने,उद्यम आधार,एफएसएसएआय,एपीईडीए, प्रदूषण नियंत्रण मंडळ,जीएसटी,आपली बाजार समिती परवाना यांची सविस्तर माहिती दिली.विनोद रहांगडाले,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वडसा यांनी एफपीओच्या स्थापनेपासून मूल्यसाखळी निर्मितीपर्यंत सर्व मुद्द्यांवर विचार मांडले.महेंद्र दोनाडकर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आरमोरी यांनी सेंद्रिय शेती,जैविक निविष्ठा निर्मिती,सेंद्रिय प्रमाणीकरण व ब्रँडिंगविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विनोद रहांगडाले यांनी केले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नोडल अधिकारी अर्चना कोचरे तसेच डॉ.कापगते, सहारे,मदनकर,कांबळे,माटे आणि मुनघाटे यांनी महत्वाचे योगदान दिले.कार्यशाळेत शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी,शेतकरी तसेच कृषी,उद्योग व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!