- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-शिंगाडे काढण्यासाठी गाव परिसरातील बोडीत गेलेल्या एका ५८ वर्षीय इसमाचा
शिंगाडे काढत असतांना बोडीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार २८ डिसेंबरच्या दुपारी अडीच वाजेच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या चोप येथे उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. उमरावसिंग दूधबर्वे वय ५८ वर्षे,रा.चोप(कोरेगाव), ता.देसाईगंज असे मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,उमरावसिंग दूधबर्वे हे गावात तसेच परिसरात शिंगाडे विकण्याचा व्यवसाय करीत होते.दोन दिवसांपूर्वीच त्यांनी गावात तसेच आजूबाजूच्या गाव परिसरात शिंगाड्यांची विक्री केली होती.अशातच ते आज शनिवारी शिंगाडे काढण्यासाठी गावा नजिक असलेल्या बेल बोडी या ठिकाणी गेले होते.उमरावसिंग दूधबर्वे हे बोडीतील शिंगाडे टायर-टुबवर बसून काढीत असतांना तोल जाऊन बोडितील पाण्यात पडले.बोडित पाणी भरपूर असल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.सदरची घटना नागरिकांच्या निदर्शनास येताच देसाईगंज पोलिसांना पाचारण करण्यात आले.त्यानुसार पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल करून मर्ग दाखल केला.
सदरची घटना ही डिसेंबर महिन्यातीलच दुसरी घटना असून यापूर्वी ९ डिसेंबरला एका ३५ वर्षीय इसमाचा गावापासून दीड किलोमिटर अंतरावरील कसारी मार्गे असलेल्या तलावात बुडून मृत्यू झाला होता.हे विशेष.
- Advertisement -

