Wednesday, June 24, 2026
Homeदेसाईगंजशहरातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी शॉपिंग सेंटर मधील रिकामे गाळे द्या..!-माजी युवक...

शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी शॉपिंग सेंटर मधील रिकामे गाळे द्या..!-माजी युवक काँग्रेस शहराध्यक्ष पिंकु बावणेंनी केली मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- गेल्या दहा वर्षांपासून शासकीय पदभरती बंद असल्याने दिवसेंदिवस बेरोजगारांच्या संख्येत भर पडत आहे.अशातच अनेकजण पदभरती करीता आवश्यक वयोमर्यांदा ओलांडल्याने उदरनिर्वाहासाठी वाम मार्गाला लागण्याची दाट शक्यता लक्षात घेता शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी देसाईगंज नगर परिषद शॉपिंग सेंटर मधील रिकामे गाळे उपलब्ध करून देण्याची मागणी देसाईगंज शहर युवक काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष पिंकु बावणे यांनी मुख्याधिकारी डाॅ.कुलभुषण रामटेके यांचेकडे केली आहे.

देसाईगंज नगर परिषदेच्या विकास योजनेंतर्गत बाजार विभागाच्या आरक्षण क्रमांक पाच वरिल नवि६ (अ) योजनेनुसार बांधलेल्या नगर परिषद शॉपिंग सेंटर मधील गाळेधारकांशी करारनामा करताना बिअरबार,वर्कशॉप, स्फोटक पदार्थ गोडाऊन,खते व जुगार ईत्यादी व्यवसाय करता येणार नसल्याचे करारनाम्यातील अनुच्छेद ६ मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे.असे असतांना या शॉपींग सेंटर मध्ये अनेकांनी वर्कशॉप लावले असुन अर्ध्यापेक्षा जास्त नगर परिषदचे शॉपींग सेंटर गोडावुन साठी वापरण्यात येत असल्याने बरेच गाळे नेहमीच बंद अवस्थेत दिसतात.यामुळे, शहरातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय होत आहे.नगर परिषद देसाईगंजचे मुख्याधिकारी यांच्यासोबत गाळेधारकांनी केलेल्या करारनाम्यातील अटी शर्तीचे उल्लंघन केल्या जात असतांना  नगर  परिषद गोडाऊन करिता सर्रास वापर करणाऱ्या गाळेधारकांवर  कारवाई करित नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांतुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे करण्यात आलेल्या करारनाम्यातील अटी व शर्थी नुसार एका सुशिक्षित बेरोजगारास एकच व्यावसायिक प्रयोजनार्थ गाळा देणे बंधनकारक असताना अनेकांकडे तब्बल पाच-पाच गाळे असल्याचे धक्कादायक वास्तव असुन सदर गाळ्यांचा वापर गोडाऊन करीता करण्यात येत असल्याने गाळे उपलब्ध असुनही सुशिक्षित बेरोजगारांसाठी गाळ्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करून सुशिक्षित बेरोजगारांना वाऱ्यावर सोडले जात आहे.

तसेच नगर परिषद शॉपींग मुलभुत सोयीचा अभाव,पार्किंगची कृत्रिम समस्या,आरक्षण क्रमांक पाच मध्ये गाळेधारकांचे अतिक्रमण तसेच गाळेधारक आपलेच सामान आपल्याच दुकानासमोर रस्त्यावर ठेवुन वाहतुकीला अडथळा निर्माण करणे अशा अनेक समस्यांच्या अजगरी विळख्यात अडकलेला नगर परिषद शॉपींग सेंटर बाबतीत मुख्याधिकारी यांनी व्यक्तीश: लक्ष देऊन गोडाऊन व वर्कशॉपसाठी वापरण्यात येणारे शॉपींग सेंटर खुले करुन शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना देऊन न्याय देण्याची मागणी बावणे यांनी मुख्याधिकारी यांचेकडे केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!